प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी माझ्यावरील आरोप चुकीचे; जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचं स्पष्टीकरण
Ahmednagar News : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Ahmednagar News : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्यानं आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव आल्यानंतर भाजपनं मुंबईत पत्रकार परिषद घेत गडाख यांच्यावर दबाव आणण्याचा आरोप करत राजीनामा देण्याची मागणी केली. यानंतर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी एबीपी माझाशी संवाद साधत माझ्यावर होणारे आरोप चुकीचे असून केवळ राजकीय हेतूने मला बदनाम केलं जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रतीक माझा पीए कधीच नव्हता आणि माझा त्याच्याशी संपर्क असल्याचा एक तरी पुरावा विरोधकांनी द्यावा, असं आव्हान सुद्धा गडाख यांनी केलं आहे.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस नगर औरंगाबाद रोडवर प्रतीक याने आत्महत्या केली असून या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संस्थेतील 7 जनविरोधात नगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रतीक काळे यानं काही वर्ष प्रशांत गडाख यांचे स्विय्य साहाय्यक म्हणून काम पाहिल्याची प्राथमिक माहिती आहे.
अहमदनगर मधील प्रशांत गडाख यांच्या दंत महाविद्यालयात काम करणाऱ्या प्रतीक काळे याने तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद रोडवर आत्महत्येपूर्वी व्हिडीओ व्हायरल करत आणि सोशल माध्यमांवर पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या आत्महत्येनंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या असून या आत्महत्या प्रकरणी संस्थेतील 7 जणांविरोधात नगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं तर या आंदोलनाला नेवासा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील पाठिंबा दिला होता. प्रतीक काळे यानं सोशल माध्यमांवर केलेल्या सुसाईड नोटप्रमाणे चौकशी होऊन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुरकुटे यांनी केली आहे.
अहमदनगर-औरंगाबाद रोडवर झाडीत प्रतीकने गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र या घटनेनंतर मयत प्रतीक काळे यांच्या बहिणीच्या फिर्यादीवरून संस्थेतील 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात गडाख कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचं बहिणीनं स्पष्ट केलं आहे. त्यानं व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप दारूच्या नशेत केली असल्याचं बहिणीनं सांगितलं असून प्रतीकने मला आत्महत्येपूर्वी फोनवर सगळं सांगितले होतं. त्यामुळे यात गडाख दोषी असते, तर आम्हीच त्यांना सोडलं नसतं, असं सांगताना कोणीही राजकारण करू नये असं प्रतीक्षा हिने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकीकडे सोशल माध्यमात व्हायरल झालेला व्हिडीओ आणि पोस्ट यावरून विरोधक गडाख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे प्रतीक काळेच्या बहिणीनं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आत्महत्ये मागे असलेलं नेमकं कारण पोलीस तपासात पुढे येणार का? हे पाहव लागणार आहे.