एक्स्प्लोर
सीलबंद कंटेनरमध्ये जीवंत माणूस सापडल्याने खळबळ
रायगडः उरणमध्ये एनएसआयपीटी कंपनीच्या गेटवर निर्यात होणाऱ्या एका कंटेनरमध्ये जिवंत माणूस सापडल्याने खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्कला जाणाऱ्या या कंटेनरमध्ये महिलांच्या चपलांचा स्टॉक होता. मात्र त्यामध्ये चक्क जीवंत माणूस सापडला आहे.
मीरा रोड इथल्या कविज फॅशन या कंपनीतून चपलांचा माल निर्यात होत होता. उरणच्या बंदराबाहेर या कंटेनरचं सर्व्हेक्षण सुरू असताना त्यातून आलेल्या आवाजानं त्याचं सील तोडण्यात आलं. तेव्हा आत एक 20 ते 22 वर्षांचा तरुण आढळून आला.
पूर्णपणे सील असलेल्या या कंटेनरमध्ये हा तरुण कसा गेला वा अडकला याबाबत कस्टम्स आणि पोलीस यांच्याकडून चौकशी सुरू आहे. बंद कंटेनरमध्ये माणूस काही काळानंतर जीवंत राहणं अशक्य आहे. मात्र या कंटेनरमध्ये हा व्यक्ती एवढा वेळ जीवंत कसा राहिला याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement