एक्स्प्लोर
Advertisement
अलिबाग-मुंबई प्रवास गतिमान होणार, उपनगरी रेल्वेच्या विस्ताराला मंजुरी
अलिबाग ते मुंबई हा प्रवास जलद व्हावा, यासाठी अलिबाग ते पेण असा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यावरुन पॅसेंजर गाड्या धावतील. या प्रकल्पावर काम सुरु असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. पेण ते अलिबाग कॉरिडॉरचं काम गतिमान करण्यात येत आहे. कल्याण ते मुरबाड मार्गालाही रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
परळ टर्मिनस, 15 डब्यांची लोकल, पुणे ते नागपूर 'हमसफर एक्सप्रेस' या सेवांचं उद्घाटन, पेण ते थळ आणि जासई-उरण विद्युतीकरण, कुर्ला, सायन, दिवा, जीटीबी नगर, महालक्ष्मी आणि पालघर स्थानकात पादचारी पूल, नेरळ ते माथेरान गाडीला पारदर्शक डबा इत्यादी सुविधा फडणवीस आणि गोयल यांच्या हस्ते रविवारी सुरु करण्यात आल्या.
अलिबाग ते मुंबई हा प्रवास जलद व्हावा, यासाठी अलिबाग ते पेण असा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यावरुन पॅसेंजर गाड्या धावतील. या प्रकल्पावर काम सुरु असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
रेल्वेमंत्र्यांनी कल्याण ते मुरबाड या 726 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. एमयूटीपी-3 आणि 3 ए या योजना मुंबईचं चित्र बदलणाऱ्या असतील. त्यामुळे लोकल गाड्या आणि त्यांच्या फेऱ्याही वाढतील. त्यामुळे प्रवासी क्षमताही वाढेल. यासाठी अर्थसंकल्पात तर 55 हजार कोटींची तरतूद झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्यासह अन्य परिवहन सेवांसाठी लवकरच एकात्मिक तिकिट प्रणाली आणण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांसाठी आणखी 180 सरकते जिनेही मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान नवीन चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement