अकोल्यात गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात, एका तरुणाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
अकोल्यातून (Akola) एक दुःखद बातमी समोर येत आहे. गणेश विसर्जन करुन परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.
Akola Accident News : अकोल्यातून (Akola) एक दुःखद बातमी समोर येत आहे. गणेश विसर्जन करुन परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. अकोल्यातील पातूर-अकोला रस्त्यावर ही घटना घडली आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेला तरुण आणि जखमी झालेले सर्वजण अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी आहेत. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच कापशी तलावावरुन गणेश विसर्जन करुन परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला आहे. मृत आणि जखमी असे चौघे जण एकाच दुचाकीवर जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने जबर धडक दिली आहे. त्यामुळं हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अक्षरशः दुचाकीचा चूराडा झाला आहे. तर कारच देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान रामचरण अंधारे असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव. तर राहुल खोंड, विनोद डांगे, विकी माळी हे गंभीर असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
बेळगावच्या जक्कीन होंड तलावात गणेश विसर्जनाच्या वेळी एका तरुणाचा बुडून मृत्यू
महत्वाच्या बातम्या:
Pune Accident News: पुण्यात कहरच झाला, मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी, केशवनगरमधील घटना
























