Nagpur News : राजकारणातील चाणक्य अजितदादा! नागपुरात लागलेल्या होर्डिंगची सर्वत्र चर्चा, अनधिकृत होर्डिंगवर मात्र कारवाईचा बडगा?
Vidhan Parishad Election Result 2024 : राजकारणातील चाणक्य, अजित दादा" अशा आशयाचे नागपुरात लागलेल होर्डींग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
Nagpur News नागपूर : "राजकारणातील चाणक्य, अजित दादा" अशा आशयाचे नागपुरात (Nagpur News) लागलेल होर्डींग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. नागपूरच्या विधान भवनाच्या समोर हे होर्डिंग लावण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पदाधिकाऱ्यांकडून हे होर्डिंग लावण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result 2024) दोन आमदार निवडून आणण्यासाठी आमदारांची पुरेशी संख्या नसतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकीय कौशल्य आणि नियोजनाने दोन्ही आमदार पहिल्या पसंतीच्या मतदानातून निवडून आले. त्यानंतर अजित दादा हेच राजकारणातील चाणक्य आहे, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी या होर्डिंगमधून केला आहे.
विधानभवनाच्या समोर मुख्य रस्त्याच्या कडेला बांबू लावून हे होर्डिंग अनधिकृतपणे लावण्यात आले आहे. त्यामुळे हाकेच्या अंतरावर महापालिकेचे मुख्यालय असताना महापालिकेचे अधिकारी या अनधिकृत होर्डिंग वर काय कारवाई करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमची मते होती, 42 पंरतू आम्हाला 47 मते पडली- अजित पवार
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) यांच्या गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदारांचं संख्याबळ होतं. विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत. आमची मते 42 होती, पंरतू आम्हाला 47 मते पडली आहेत. ज्यांनी आमच्या उमेदवारांनी मते दिली त्यांचे मी आभिनंदन करतो. त्यांनी दिलेल्या विश्वासाला आमचे आमदार निश्चितपणे पात्र राहून पुढची वाटचाल करतील. जनतेचे प्रश्न सोडवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
कोणकोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26
शिवसेना ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर
आणखी वाचा