![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on Baramati : तेव्हा अजितदादा म्हणाले 'वरिष्ठ' भावनिक करतील आता तेच दादा म्हणतात, बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये!
मागील बारामती दौऱ्यात वरिष्ठ येतील आणि भावनिक करून जातील, असा टोला शरद पवार यांना लगावला होता. आत तेच अजित पवार आज स्पष्टपणे बारामतीकरांना भावनिक करताना दिसून आले.
![Ajit Pawar on Baramati : तेव्हा अजितदादा म्हणाले 'वरिष्ठ' भावनिक करतील आता तेच दादा म्हणतात, बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये! Ajit Pawar on Baramati says Baramatikars are requested not to be isolated for him sharad pawar supriya sule Ajit Pawar on Baramati : तेव्हा अजितदादा म्हणाले 'वरिष्ठ' भावनिक करतील आता तेच दादा म्हणतात, बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/1829073a2ef5b5d587e48e44c9e0b2861708100059490736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : आम्ही उभा करू त्या खासदाराला निवडून आणले,तरच मी विधानसभेला उभा राहीन. नाहीतर मी माझा प्रपंच करेन. नेते येतील आणि भावनिक करतील काय करायचं ते तुम्ही ठरवा, माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पण तुम्ही ठरवलं तर याला बास करायचं तर मी बास म्हणजे बास परत मी कधीच ऐकणार नाही, असा भावनिक वजा सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये केले. मागील बारामती दौऱ्यात वरिष्ठ येतील आणि भावनिक करून जातील, असा टोला शरद पवार यांना लगावला होता. आत तेच अजित पवार आज (16 फेब्रुवारी) स्पष्टपणे बारामतीकरांना भावनिक करताना दिसून आले.
मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो मी घरातला आहे ना?
अजित पवार म्हणाले की, मला विरोधी पक्षनेते पद नको होतं पण सगळ्या आमदारांनी सांगितले अजित पवारांना करा दुसऱ्याला आम्ही स्वीकारणार नाही. काही जण सत्ता आल्यावर असे वागतात परत सत्ता गेल्यावर त्याला चेंबरमध्ये पण बोलावत नाहीत. यावेळी नेहमी सारखी परिस्थिती नाही. काही जणांचा जीव वरिष्ठांवर असणार, विकास करायचा असेल तर मोदींच्या विचाराचा माणूस गेला तर कामे होतील.
उमेदवार कोण असणार हे मी महायुतीची बैठक झाली की सांगेल. दबावाने माझ्या सोबत राहू नका. जे त्यांचे काम ते करीत आहेत त्यांना परत माझी गरज लागेल, तेव्हा त्यांना दाखवतो तेव्हा माझ्याकडे यायचं नाही. मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो मी घरातला आहे ना? वरिष्ठ म्हणत होते सुप्रियाला करा, पण मी घरातलाच आहे ना? मला कुटुंबातील लोकांनी एकटे पडले तरी बारामतीकराणी एकटे पाडू नये अशी विनंती करतो, असे ते म्हणाले.
तर माझा कुणीच प्रचार करणार नाही
ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचा काळ असतो. आमच्या घरात वरिष्ठांना मान आहे. माझ्या घरातील दोन तीन जण सोडले तर माझा कुणीच प्रचार करणार नाही, तुम्हाला माझा प्रचार करावा लगणार आहे. माझ्या विचाराचा खासदार चांगल्या मताधिक्याने येणार असे ते म्हणाले. काम होण्यासाठी की काम न होण्यासाठी मतदान करायचे हे तुम्ही ठरवा. कार्यकर्ता जिवंत असताना त्याचे निधन झालं म्हणून सांगितले. हे असे त्यांच्याकडून होता कामा नये.
माझी बरोबरी करणारा कोणी नाही
अजित पवार म्हणाले की, माझी बरोबरी करणारा कोणी नाही. शेतकऱ्यांच्या पोटी मी जन्म घेतला असून मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या विचाराचा खासदार निवडून आणा, बारामतीचे रेल्वे स्टेशन असे करतो ते बघा. जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत समाजात तेढ निर्माण करू देणार नाही. इंडिया आघाडीचा फुगा फुटला आहे. इंडिया आघाडीतील अनेक जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मी जो उमेदवार उभा करणार तो उमेदवार सगळीकडे लिडवर असेल. दौंडमध्ये राहुल कुल आणि आपण, इंदापूर हर्षवर्धन पाटील आहेत त्यांना प्रचार करावा लागेल. खडकवासलाचा मागील उमेदवार 65 हजरानी मागे होता. मला आता बारामती कुणाच्या पाठीमागे आहे हे बघायचा आहे? बारामती भावनिकतेच्या मागे की विकासाच्या मागे आहे हे बघायचं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)