Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अजित पवारांची फडणवीसांकडे मागणी
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत झाली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) केली आहे.
Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत झाली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) केली आहे. अजित पवार यांनी काल रात्री (19 ऑक्टोबर) फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या गोष्टी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कानावर घातल्या त्या सर्व गोष्टी मी उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे अजित पवारांनी सांगितलं.
सध्या राज्यात परतीच्या पावसावनं थैमान घातलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात हा परतीचा पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात आहेत. सध्या रब्बी पिकं काढणील आली आहेत. सोयाबीन, कापूस या पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची काढणी झाली आहे. अशातच गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीतून कशीबशी वाचलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. त्यामुळ अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस हे एमसीए कार्यक्रमात होते. त्यामुळं त्यांची उशीरा भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
गुजरातमधील राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत पदकं मिळालेल्या खेळाडूंचा सन्मान करावा
36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातमध्ये झाली. या स्पर्धेत 140 खेळाडूंनी पदक मिळवली आहेत. त्यांचा यथोचित सरकार महाराष्ट्र राज्य सरकारने करावा अशी विनंती देखील अजित पवार यांनी केली. तसेच पोलिसांच्या वसाहती कार्यालयासंदर्भातली काम सुरु ठेवावी. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात ते काल रेल्वेमंत्र्यांना भेटले. ते काम बरच पुढे गेला आहे, त्यात खंड पडू नये असं मी त्यांना म्हटल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच राज्यातील जिल्हा नियोजन समिती ग्रामविकास आणि इतर विकास कामांना दिलेली स्थगिती यासंदर्भात मी बोललो असल्याचे ते म्हणाले. अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याबद्दल सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाल्याचे अजित पवार म्हणाले.
आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना चर्चेला बोलवा
विनाअनुदानित शाळा संदर्भात जे शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करतात त्यांना चर्चेला बोलवावं. कारण दिवाळी आता जवळ आली आहे. दहा तारखेपासून ते आंदोलनाला बसले आहेत, असे अजित पवार म्हणाले. बरेच दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो नव्हतो, उद्या दिवाळीला मी जाणार होतो त्यानंतर दिवाळीनंतरच मी भेटणार होतो असेही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सह्याद्री अतिथिगृहावर भेटायची वेळ दिली होती. त्यानंतर ते म्हणाले की एमसीएच्या कार्यक्रमाला मी आहे, तर तुम्ही इथेच यावे. त्याप्रमाणं मी इथे आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: