एक्स्प्लोर
भाजपमध्ये गुंडांच्या शुद्धीकरणाची मोहीम सुरु आहे: अजित पवार

सोलापूर: 'भाजपमध्ये सध्या गुंडांच्या शुद्धीकरणाची मोहीम चालू आहे.' अशी घणाघाती टिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 'भाजपात सध्या वादग्रस्त व्यक्तींना प्रवेश दिला जातो आहे. त्यांना पक्षात घेऊन गंगेच्या पाण्याने शुद्ध केल जातं आहे. सत्तेचा वापर करून दबावतंत्राने काहींना पक्षात घेतलं जात आहे.' असा आरोप अजित पवारांनी केला आहे. ते आज सोलापुरात बोलत होते. इतर पक्षात स्वार्थ साध्य न झाल्याने भाजपात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भाजपने खोटी आश्वासने देऊन पक्षात भरणा चालवला आहे. त्यामुळे भाजप हा गुंडांचा पक्ष बनत चालला आहे. अशी टिका अजित पवारांनी केली. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. 'पटत नसेल तर बाहेर का पडत नाही? टिकाही करायची आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचं, हा देखावा का?' असा सवालही त्यांनी विचारला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























