एक्स्प्लोर
मनसेचे नगरसेवक 5 कोटी देऊन फोडले : अजित पवार
राज ठाकरे मुंबईमध्ये मध्यतंरी भेटले होते. त्यांचे नगरसेवक पाच-पाच कोटी रुपयाला फोडले असे राज म्हणाल्याची आठवण सांगतानाच हा पैशांचा माज उतरवण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे पवार यांनी सांगितले.

नाशिक : मुंबई महापालिकेत मनसेचे नगरसेवक 5 कोटी देऊन फोडले आहेत. अमितच्या लग्नाची पत्रिका देताना राज ठाकरे यांनी माहिती दिली असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आता शिवसेनेचे आमदार फोडायला पण कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जातेय. भाजपकडे अमाप पैसा झालाआहे. याच जोरावर कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार फोडत आहेत, असा सनसनाटी आरोप पवार यांनी निफाड येथील सभेत बोलताना केला आहे.
या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही, परंतु दिशाभूल करायला चांगलं जमतं. या सरकारने शेतकऱ्यांना काय दिले ? इथला पालकमंत्री पण जळगाव जिल्ह्यातून आयात केला आहे. त्याला नाशिकचे प्रश्न काय कळणार? नाशिकच्या लोकांनी भाजपला मतदान केलं नव्हतं का? मग त्यांना हक्काचा पालकमंत्री का मिळाला नाही? असा सवाल पवार यांनी केला. राज्याच्या मंत्रिमंडळात एकही मंत्री शेतकरी नाही, हे गिरीश महाजन बिबट्याला मारण्यासाठी बंदूक दाखवतात ही सर्व नौटंकी सुरू आहे अशा शब्दात पवार यांनी टीका केली.
भाजपकडे अमाप पैसा झाला आहे. ते सत्तेसाठी काहीही करू शकतात, कर्नाटकात आमदार विकत घेण्यासाठी भाजपतर्फे करोडो रुपये फेकले जात होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मध्यतंरी भेटले होते. त्यांचे नगरसेवक पाच-पाच कोटी रुपयाला फोडले असे राज म्हणाल्याची आठवण सांगतानाच हा पैशांचा माज उतरवण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे पवार यांनी सांगितले.
भाजपचे आमदार मुली पळवण्याची भाषा करत आहे. तुमच्या घरातील मुलगी आहे का ? त्या आमदाराचे नाव राम कदम आहे त्याचे राम नव्हे रावण नाव ठेवायला हवे होते. मध्यंतरी भाजपचे आमदार धस म्हणाले की, उत्तर भारतीय राहतात इकडे आणि मुलं तिकडे जन्माला येतात. जीभ दिली म्हणून काहीही बोलायचे का ?अशा वाचाळवीर आमदारांचा पवार यांनी समाचार घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
