एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गावठी कट्टा 25 हजार, चॉपर 5 हजार, नगरमध्ये माहिती देणाऱ्यांना बक्षीस!
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. गुन्हेगारीला निर्बंध घालण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे.
अहमदनगर: नगर जिल्हा एका महिन्यात दोन दुहेरी हत्याकांडाने हादरल्यानंतर, आता पोलिसांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. गुन्हेगारीला निर्बंध घालण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी भरघोस बक्षीसं जाहीर केली आहेत.
केडगाव शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर जामखेडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडात गावठी कट्ट्याचा वापर झाल्यानं, गावठी कट्टे पोलीसांच्या रडारवर आहे.
गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीसांनी दिला आहे. गावठी कट्ट्याची माहिती देणार्यांना रोख 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहिर केलं आहे.
शिवाय माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे.
इतकंच नाही तर पोलिसांनी इतर गुन्ह्यांचा आणि अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्यासाठीही बक्षीसं जाहीर केली आहेत.
कोणती माहिती दिल्यावर किती बक्षीस?
- कट्टा - 25 हजार
- तलवार - चॉपर - 5 हजार
- मारामारी आणि दहशत करणाऱ्या गँगची माहिती - 5 हजार
- अवैध सावकारी - 2 हजार
- अवैध जुगार - मटका - 2 हजार
- अवैध दारु - 2 हजार
- गांजा, अफू चरस - 2 हजार
- फरार आरोपी - 5 हजार
- कुंटणखाना - 5 हजार
- मावा आणि सुगंधित तंबाखू - 5 हजार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement