एक्स्प्लोर
नगर-औरंगाबाद रोडवर जीपचा अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू
अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर जीपने समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
जीपमधील प्रवासी सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. परंतु रात्री दोनच्या सुमारास नगरजवळ धनगरवाडी फाट्यावरुन जात असताना, जीप चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. जीपने औरंगाबादहून नगरकडे येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.
दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेले सातही जण पुण्यातील यवतमधील रहिवासी होते. सर्व मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात आणले आहेत.
मृतांची नावं : 1. मनोहर रामभाऊ गायकवाड (वय 45 वर्ष), 2. अंकुश दिनकर नेमाने (वय 45 वर्ष), 3. मुबारक अबनास तांबोळी (वय 52 वर्ष), 4. बाळू किरण चव्हाण (वय 50 वर्ष), 5. स्वप्नील बाळू चव्हाण (वय 17वर्ष), 6. गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40 वर्ष), 7. अरुण पांडुरंग शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement