(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Singh Tomar : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आज पुण्यात, फलोत्पादन क्षेत्रातल्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांसह उद्योजकांचा करणार सत्कार
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात राष्ट्रीय पातळीवरील फलोत्पादन मूल्य साखळीसंबंधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Narendra Singh Tomar : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) हे आज (1 नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात (Pune) राष्ट्रीय पातळीवरील फलोत्पादन मूल्य साखळीसंबंधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार होणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयातर्फे पुण्यातील वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत (VAMNICOM) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात एका प्रदर्शनाचे उद्घाटनही कृषीमंत्री तोमर यांच्या हस्ते होणार आहे. तेसच फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा सत्कारही होणार आहे. तसेच सेंद्रीय मूल्य साखळीवर आधारित, फलोत्पादन क्षेत्रातील यशोगाथांचे संकलन असणाऱ्या 'ऑरगॅनिक पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टीस फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही कृषीमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 'भारतात फलोत्पादन मूल्य साखळीचा विस्तार-शक्यता आणि संधी' या विषयावर आधारित या कार्यक्रमात शेतकरी, कृषी आधारित स्टार्ट-अप, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी, एफपीओ, विविध पिकांसाठीची उत्कृष्टता केंद्रे, भारतीय कृषी संशोधन परिषदेची पिक विशिष्ट संशोधन केंद्रे तसेच प्रिसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर्स असे संबंधित भागधारक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
बागायती पिकांसंदर्भातील कार्यक्रम आणि संधी
परदेशी, देशी आणि उच्च मूल्ये असणाऱ्या बागायती पिकांसंदर्भातील कार्यक्रम आणि संधी या सत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. या सत्रात कृषी आणि कृषक कल्याण विभागाचे प्रतिनिधी परदेशी, देशी आणि उच्च मूल्ये असणाऱ्या बागायती पिक क्षेत्रातील संधींचा आढावा घेतील. त्याचबरोबर वक्ते, सेंद्रिय शेती क्षेत्रात फलोत्पादन मूल्य शृंखलेचा अवलंब करण्याबद्दल मार्गदर्शन करतील आणि विदेशी फळांशी संबंधित शेतकऱ्याच्या यशोगाथाही उपस्थितांना सांगतील.
फुलांच्या लागवडीशी संबंधित कार्यक्रम आणि संधी
या सत्रात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फुलांशी संबंधित संशोधनविषयक संचालनालयाचे प्रतिनिधी, या क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि पुढच्या वाटचालीबद्दल चर्चा करतील. तसेच या क्षेत्रातील ई-कॉमर्स आणि वेस्ट टू वेल्थ स्टार्ट-अपची वाढ आणि यशोगाथा उपस्थितांना सांगतील.
फलोत्पादनातील विस्तार नवकल्पना
या सत्रात भारतीय कृषी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि -भारतीय फलोत्पादन संशोधन आणि संस्था (ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च) यासंस्थेचे प्रतिनिधी भारतातील फलोत्पादनातील कापणीनंतरचे तंत्रज्ञान आणि आधुनिकता यावर भाष्य करतील. तसेच, या क्षेत्रांतील तज्ज्ञ वक्ते फलोत्पादनांतील ताजेपणा टिकविण्यासाठी तंत्रज्ञान आणि आधुनिकता तसेच यशस्वी कृषी उत्पादन संस्था (FPO) यांवर मार्गदर्शनपर भाषणे करतील.
कापणीनंतरचे तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संस्था आणि आव्हाने
या सत्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट अर्थात निफ्टेम (NIFTEM) यांच्या प्रतिनिधीद्वारे फलोत्पादनातील कापणीनंतरचे तंत्रज्ञान यांचे अवलोकन केले जाईल. तसेच, अन्न तंत्रज्ञानात अग्रेसर रहाण्यासाठी फलोत्पादनातील नवीन संशोधन आणि केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेची (CFTRI) त्याबाबत भूमिका यावर चर्चा होईल.
बागायती वस्तूंचे विपणन आणि निर्यात आणि कृषी/होर्टी स्टार्ट अप
या सत्रात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, अपेडाच्या (APEDA) प्रतिनिधीद्वारे भारतीय फलोत्पादनातील निर्यातीच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले जाईल. फलोत्पादन मूल्य साखळी परीचालनासाठी असलेले बाजार / कंपन्या फलोत्पादन वस्तूंचे विपणन आणि निर्यात यावर कृषी / बागायती स्टार्ट-अप यांसाठी तज्ञांसह चर्चासत्र आयोजित केले जाईल.
फलोत्पादनातील यांत्रिकीकरणासाठी नवकल्पना विकसित करणे
या सत्रात फलोत्पादनातील यांत्रिकीकरण आणि त्यात भारतीय कृषी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि -भारतीय फलोत्पादन संशोधन आणि संस्था (ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च) यांची भूमिका याबद्दल चर्चा होईल. यावेळी वक्ते ग्रामीण भारतातील फलोत्पादन आणि शाश्वत शेतीमध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना सांगतील.
कीटक मुक्त क्षेत्र: फलोत्पादन निर्यातीसाठी संबंधित यंत्रणेचा दृष्टीकोन
या सत्रात वनस्पती संरक्षण विलिनीकरण आणि साठवण संचालनालयाच्या प्रतिनिधीद्वारे कीटकमुक्त फलोत्पादन उत्पादनाचा आढावा घेतला जाईल. तसेच, वक्ते फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीच्या संधी आणि सेंद्रिय फलोत्पादन निर्यातीवरील महिला उद्योजकांच्या यशोगाथा यावर बोलतील.
महत्त्वाच्या बातम्या: