Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर महायुती आक्रमक, ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुतीही आता प्रत्युत्तर देणार
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या कोकणातल्या सभांना महायुतीही आता प्रत्युत्तर देणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला, त्यानंतर महायुतीचं लक्ष कोकणाकडे आहे.
![Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर महायुती आक्रमक, ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुतीही आता प्रत्युत्तर देणार After Uddhav Thackeray s Konkan tour Mahayuti will also Focus on Konkan BJP Shiv Sena Maharashtra Politics marathi news Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर महायुती आक्रमक, ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुतीही आता प्रत्युत्तर देणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/07/9e34eb435062bf8d8a7f0263b62f8ae11707273909105322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics News Update : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोकण दौऱ्यानंतर (Kokan Tour) महायुती (Mahayuti) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कोकणातल्या सभांना महायुतीही आता प्रत्युत्तर देणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा (Uddhav Thackeray Kokan Visit) केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सरकार आणि विशेषतः भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, त्यांच्या आता याच टीकेला महायुती (BJP-Shiv Sena) देखील त्याच भाषेत उत्तर देणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर महायुती आक्रमक
उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर आता महायुती देखील उद्धव ठाकरेंना कोकणात प्रत्युत्तर देण्याची रणनिती आखत असून, कोकणात जाहीर सभा घेत अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काय केलं याचा लेखाजोखा महायुती मांडणार आहे. लवकरच या दौऱ्यांची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे.
कोकणात ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याची रणनिती
ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुतीही आता प्रत्युत्तर देणार आहे. कोकणात लवकरच महायुतीच्या जाहीर सभा होणार आहेत. भराडी देवीचे आशीर्वाद घेत महायुतीचा कोकणात सभांचा धडाका सुरू होणार असल्याचं समोर येत आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केलं, याची माहिती आता कोकणी जनतेपर्यंत महायुतीचे नेते पोहोचवणार आहेत. 'शासन आपल्या दारी'च्या माध्यमातून सरकार कसं कोकणी जनतेच्या मागे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्नही महायुती करणार आहे.
ठाकरे गटाचं आता 'मिशन विदर्भ'
दरम्यान, ठाकरे गटाने आता विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर पूर्व विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या सहा लोकसभा मतदारसंघापैकी रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांचा विजय झाला होता. मात्र, आता खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेत आहेत. त्यामुळे आता रामटेक आणि इतर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट किती जागांवर निवडणुक लढवणार हे पाहावं लागेल. या बैठकीला पूर्व विदर्भाची जबाबदारी असलेले ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)