एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Gujrat Border : आता महाराष्ट्र-गुजरात सीमेवरही वादाची ठिणगी; वाद लवकर मिटवण्याची सीमावासियांची मागणी 

गुजरातमधील सोळसुंभा ग्रामपंचायतने वेवजी ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारलेले पथदिवे वेवजी ग्रामपंचायतने बंद केले असून हा सीमावाद लवकर मिटवावा अशी मागणी येथील सीमावासियांकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Gujrat Border Issue: कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद (Karnataka maharashtra border dispute) सुरू असतानाच आता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तलासरीतील (Maharashtra Talasari) सीमेवर असलेल्या वेवजी आणि गुजरातमधील सोळसुंबा या ग्रामपंचायतींचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने या ग्रामपंचायतींचा वाद सुरूच आहे. गुजरातमधील सोळसुंभा ग्रामपंचायतने वेवजी ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारलेले पथदिवे वेवजी ग्रामपंचायतने बंद केले असून हा सीमावाद लवकर मिटवावा अशी मागणी येथील सीमावासियांकडून करण्यात येत आहे.

वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता

कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाप्रमाणेच गुजरात आणि महाराष्ट्र सीमा वादही सुरूच आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तलासरीतील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातमधील सोळसुंबा ग्रामपंचायत अतिक्रमण करत असल्याचा आरोप वेवजी ग्रामपंचायत आणि येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. गुजरातच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीला वीज पुरवठा करण्यासाठी सोळसुंबा ग्रामपंचायतने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीतून पथदिवे उभारले असून यानंतर हे अतिक्रमण सुरू झाल्याचा आरोप येथील सरपंच आणि ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेले सर्व पथदिवे सध्या बंद करण्यात आले असून यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पथदिव्यांच्या नावाखाली गुजरात मधील सोळसुंबा या ग्रामपंचायतने महाराष्ट्रातील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे . 

दोन्ही ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने वाद 

वेवजी आणि सोळसुंबा या दोन्ही ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने हा वाद मागील अनेक वर्षांपासून चिघळला आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले बुरुज आजही या ठिकाणी दिसून येत असून ते सध्या अडगळीत पडले आहेत. याबाबत हद्द निश्चितीसाठी ग्रामपंचायतकडून सरकार आणि वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार केला जातोय. वरिष्ठ पातळीवर ही बैठक होतात मात्र अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही.  बैठकांमधून कोणताही निर्णय न झाल्याने येथील ग्रामस्थांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे भूमी अभिलेखकडून ही मोजणी करून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील  सरकारांनी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

वेवजी आणि सोळसुंबांचा सुरू असलेला वाद हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाइतका इतका आज ज्वलंत नसला तरी मागील अनेक वर्षांपासून याची धुसफुस सुरू आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याआधीच सरकारने यात हस्तक्षेप करून या दोन्ही राज्यांची हद्द निश्चिती करावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget