Neral-Matheran Mini Train : माथेरानची राणी पुन्हा रुळावर; आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू
Neral-Matheran Mini Train : तब्बल तीन वर्षानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरू झाली.
Neral-Matheran Mini Train : तब्बल तीन वर्षानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरू झाली. आज सकाळी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटली. सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं प्रवासी (Passenger) उपस्थित होते. उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठीच तो आनंदाचा क्षण होता. ही ट्रेन सकाळी 11.30 वाजता माथेरानला (Matheran) पोहोचणार आहे.
प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण
माथेरान ते नेरळ या मिनी ट्रेनची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर तीन वर्षात्या प्रतिक्षेनंतर सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. माथेरान ते नेरळ ही मिनी ट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती. गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचं काम सुरु होतं. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झालं आहे.
ट्रेन सुरु झाल्यामुळं पर्यटनाला जाण्याचा मार्ग सुकर
ऑगस्ट 2019 पासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद होती. प्रचंड पावसामुळं घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते. जमीन उरली नव्हती, त्यामुळं संपूर्ण मार्ग पुन्हा नव्यानं बांधावा लागला. अखेर ही सेवा सुरु होत आहे. बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर 2020 पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवाच सुरु केली. मात्र नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण मिनी ट्रेन सेवा बंदच ठेवण्यात आली होती. या मार्गावर रुळ, रुळालगतचे क्रॅश बॅरियरसह अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. ही कामे पूर्ण होताच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची चाचणी केल्यानंतर आजपासून सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या: