एक्स्प्लोर

18 वर्षांपासून पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद, 65 वर्षीय हसीना बेगम औरंगाबादला परतल्या

18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम भारतात परतल्या आहेत. मला स्वर्गात असल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतात परतल्यानंतर दिली.

औरंगाबाद : 18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम भारतात परतल्या आहेत. 65 वर्षीय हसीना बेगम 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. परंतु पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आलं नाही. त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद करण्यात आलं होतं. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी (26 जानेवारी) त्या भारतात परतल्या.

मायदेशी परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. "मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटतंय की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आलं आहे. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतात परतल्यावर दिली.

हसीना बेगम यांना भारतात परत आणण्यासाठी मदत करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी आभार मानले.

हसीना बेगम आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. तिथे पोहोचल्यावर लाहोरमध्ये त्यांचा पासपोर्ट हरवला. मागील 18 वर्षांपासून त्या पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद होत्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली.

हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sangli Lok Sabha Election:मविआत जुंपली, तर भाजपचा प्रचार सुरु;सांगलीतील पत्रकारांचा निवडणुकीचा अंदाजJalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Embed widget