Exclusive : अदानी, बिल गेट्स देशाचा अजेंडा ठरवतात, कोबाड गांधी यांची पहिली मुलाखत
जनतेचा विकास म्हणजे देशाचा विकास असून देशात परिवर्तनाची गरज असल्याचे मत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत कोबाड गांधी (Kobad Gandhi) यांनी व्यक्त केले.
मुंबई : माओवाद्यांनी काढलेले निवेदन वाचून मला धक्काच बसला. मी तिहारमध्ये असताना हे लिहिलं होतं, पण त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मी दहा वर्षे तुरुंगात होतो, माझ्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. त्यावेळी पण मी सांगितलं होतं की हा मीडिया ट्रायलचा प्रकार आहे, असल्याचे मत कोबाड गांधी यांनी व्यक्त केले. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत कोबाड गांधी बोलत होते. नक्षलवादी चळवळीशी तब्बल 40 वर्षे जोडलेल्या आणि सर्वात जेष्ठ सदस्य असलेल्या कोबाड गांधी यांची माओवाद्यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. लेनिन-मार्क्सच्या तत्वांशी एकनिष्ठ राहिले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अदानी, बिल गेट्स देशाचा अजेंडा ठरवतात
कोबाड गांधी म्हणाले, मी सरकार विरोधी पॉलिसी नोटबंदी, बजेटवर वीस ते पंचवीस लेख लिहिले. तुरुंगामधून एक महिना आधी लिहिलं की, कोरोनामुळे कशी परिस्थिती येणार आहे, पण काही झालं नाही. परिस्थितीमुळे आमचं चालणं बदललं. अदानी, बिल गेट्स हे अजेंडा ठरवतात, देशात पण हेच अजेंडा ठरवतात. देशात सत्ताधारी लोक आहेत. ते मोठ्या उद्योगपतीसाठी काम करतात, त्यांचे पैसे खातात. नागपूरपासून किसान आत्महत्या सुरू झाल्या. नंतर सगळीकडे परंपरा सुरू झाली. सत्ताधारी यांना पण प्रश्न विचारायला पाहिजे. मूळ प्रश्न आहे की, अर्थव्यवस्था बदलली पाहिजे. जनतेचा विकास म्हणजे देशाचा विकास मार्ग प्रमुख नाही देशात परिवर्तनाची गरज आहे.
इतके दिवस गप्प का? कोबाड गांधी यांचा सवाल
"मी पाच राज्यात निर्दोष सुटलो. मी पहिल्यापासून हे सांगत होतो की, मी सीपीआय (एम) सेंट्रल कमिटी, पॉलिटकल ब्युरो सदस्य नाही. 2009 पासून मी हे सांगत होतो, तेव्हा कोणी सांगितलं नाही मग आता का सांगितलं?" असा सवाल देखील कोबाड गांधी यांनी या वेळी उपस्थित केला. "माझ्या कामावर प्रश्न उचलला म्हणून चांगलं वाटत नाही. हे पुस्तक छापून एक वर्ष झालं तेव्हा काही बोलले नाही मग आता का? "असा प्रश्न कोबाड गांधी यांनी या वेळी उपस्थित केला.
कोण आहेत कोबाड गांधी?
कोबाड गांधी या व्यक्तिमत्वाबद्दल देशात बरंच कुतूहल राहिलं आहे. नक्षलवादावर आधारित चक्रव्ह्यू या सिनेमातील ओम पुरीचे पात्र गोविंद सूर्यवंशी हे कोबाड गांधींवर आधारित असल्याचे बोललं जातं. कोबाडबद्दलच्या कुतुहलाचे कारण ही काहीसं तसंच होतं. उच्चभ्रू, श्रीमंत पारसी मायबापांना मुंबईत जन्माला आलेला कोबाडचं शिक्षण थेट राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन जिथे शिकले त्या डून स्कूल येथे झालं. सेंट झेवियर्स मधल्या कॉलेज शिक्षणानंतर तो चक्क लंडनला पुढच्या शिक्षणासाठी पोहोचला. मात्र तिथे क्रांतिकारी विचारानं झपाटलेला कोबाड हा शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट माओवादी संघटनेचे काम करण्यासाठी भारतात परत आले.
माओवाद्यांना इतना गुस्सा क्यूँ आता है?
जेलमध्ये सुरू केलं कोबाडने "A prison मेमोयर" एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये माओवाद्यांचा पूर्णत: विरोध असणाऱ्या बुर्जवा सिद्धांताला कोबाडने डोक्यावर उचलल्याचा आरोप आहे स्वेच्छा, चांगले मूल्य आणि आनंद हे जीवन व समाज बदलण्यासाठी महत्त्वाचे असे म्हणत कोबाड ने हे मार्क्सवादी व्यवहारात दिसत नसल्याचे पुस्तकात म्हटल्याचा आरोप आहे. त्यामुळे मार्क्सवाद कधीच आपले लक्ष्य साध्य करू शकणार नाही असे म्हटले आहे.