एक्स्प्लोर

गोंदियात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरूणीवर अॅसिड हल्ला, दोघांना अटक

गोंदियाच्या खळबांधा गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या दोन तरूणांना पोलिसांकडून अटक

गोंदिया : विदर्भातील गोंदियात खळबांधा गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून दोन अज्ञात इसमांनी अॅसिड हल्ला करत पळ काढला होता. या हल्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी खामेंद्र जगणीत(24) आणि त्याचा मित्र राहुल न्हनेद (24) हे दोघेही गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दरम्यान, पीडित तरुणीही गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षणल घेत आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. खळबांधा गावात राहणारी सदर तरुणी ही नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाला सुट्या लागल्या असल्याने काही दिवसाआधी ती स्वगावी आली होती. पुन्हा कॉलेजसाठी नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असताना. यावेळी दोन अज्ञात तरुणांनी एका दुचाकी वाहनावर कापड बांधून येत तरुणीवर अॅसिड टाकत पळ काढला. तिच्या अंगावर अॅसिड टाकल्यानंतर ती मुलगी बस स्थानकावर आरडाओरड करु लागली आणि तडफडू लागली. गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना देत सदर मुलीला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला पुढील उपचाराकरता नागपुरला हलविण्यात आले. अ‍ॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेत सरकारने असे कृत्य हे नृशंस गुन्हा म्हणून गणला जाईल, असं सांगितलं होतं. तसेच पीडितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी तपास आणि सुनावणीसाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला आहे. अ‍ॅसिड हल्ल्याचे कृत्य हा अत्यंत घृणास्पद गुन्हा म्हणून गणला गेल्यास अशा खटल्यांमधील आरोपीला अधिकाधिक शिक्षा म्हणून जन्मठेप किंवा मृत्युदंड देणे शक्य होईल, असे केंद्र सरकारने याआधीच जाहीर केले आहे. मात्र तरीही अ‍ॅसिड हल्ले रोखले जात नाहीयेत. आता गोंदियातल्या या हल्लानंतर ग्रामीण भागापर्यंत अ‍ॅसिड हल्ल्याचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींकडे हे अ‍ॅसिड कुठून आले? असा सवाल देखील गावकरी करत आहेत. पाहा व्हिडीओ : गोंदियात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरूणीवर अॅसिड हल्ला, दोघांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणीRadhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget