आंबाजोगाई बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र
आंबाजोगाई बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
Beed News Update : बीड मधील अंबाजोगाई येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे. यातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि संपूर्ण गुप्तता पाळून या प्रकरणाचा वेगाने तपास करावा, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी नुकतीच पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
आंबाजोगाई येथील आठ वर्षीय बालिकेला गावातीलच किरण रामभाऊ शेरेकर (वय, 23) याने 19 मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिचे आई- वडील प्रचंड तणावाखाली आहेत.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. परंतु, आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, घटनेचा संपूर्ण गुप्तता पाळून वेगाने तपास करावा आणि आरोपीस कडक शिक्षा करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, पीडित चिमुकलीच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर याच्याविरोधात कलम 376, 376 (F), 376 (L) 504, 4, 6 बाललैंगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Beed: मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले, बीड येथील धक्कादायक घटना
- धक्कादायक! 12 वर्षीय मुलगी अत्याचारानंतर गर्भवती, पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं, नागपूरमधील घटना
- Nanded Crime : शहरातील पंजाब लॉजवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह, महिला पेशाने डॉक्टर असून आत्महत्या केल्याचा संशय