एक्स्प्लोर
सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू

सांगली : पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजता भीषण दुर्घटना घडली. पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुले, 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सर्वजण कोल्हापुरातील माले गावातील रहिवाशी आहेत. पंढरपूरहून परतत असताना मिरज-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला धडक दिल्याने दुर्घटना घडली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























