कायदा-सुव्यवस्था, महागाई कमी होत असेल तर शहराचे नाव बदला, खुलताबादच्या नामांतरावरुन अबू आझमींचा सरकारवर निशाणा
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी जोर धरत आहे. यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Abu Azmi : छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी जोर धरत आहे. यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे? नवीन शहर वसवले तर फरक पडेल असे आझमी म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था, महागाई कमी होत असेल तर शहराचे नाव बदला आम्ही समर्थन देऊ. देशातील महागाई, चीनकडून कब्जा, लाडकी बहिणींना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत. विकासाची गोष्ट झाली पाहिजे, भाईचारा वाढला पाहिजे असं आमचं मत असल्याचे मत अबू आझमी यांनी व्यक्त केले.
वक्फ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल
इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावटी नसावा असेही आझमी म्हणाले. वक्फ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काही लोकं दोन्ही नावांवर स्वार होत आहेत. काही लोकं आपल्याला सेक्युलर समजतात, मात्र दुसरीकडे हिंदुत्व देखील दाखवतात नाव न घेता असा टोला अबू आझमींनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला.किरीट सोमय्यांचं काही काम नाही आहे. महामार्गावरुन कितीतरी गाड्या जातात. तसेच त्या भागातून विमाने देखील जातात यावर त्यांचं लक्ष नाही. फक्त मस्जिद आणि लाऊडस्पीकरच ते शोधत आहेत असे आझमी म्हणाले. यांचे राजकारण देशाला बरबाद करेल, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवावे अशी मागणी आम्ही केल्याचे आझमी म्हणाले. सरकारनं लक्ष दिलं पाहिजे उत्तर भारतीयांना शिव्या दिल्या जात आहेत. निवडणुका आल्या की लांगूलचालन होतं फक्त, हे चुकीचं आहे. मनसेवर निर्बंध लादले पाहिजेत, त्याचे मी स्वागत करतो असेही आझमी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीभोवती महाराष्ट्राचे राजकारण स्थिरावलेले असताना छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी वारंवार होत आहे. इंग्रजांच्या काळापासून हे नाव रेकॉर्डवर आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील लोक ऐकमेकांवर टीका करत आहेत.
तस्लिमा नसलिम विरोधात कारवाई होत नाही. मात्र, कुणाल कामराविरोधात कारवाई होते. आपण सेक्युलर आहोत, याचा देखील विचार व्हावा. कुणाल कामराला प्रोटेक्शन दिलं पाहिजे असे आझमी म्हणाले. मला देखील लोकांकडून शिव्या दिल्या जात आहेत असे आझमी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























