एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/07/2018
- मुंबईत पावसाचं थैमान, सायन, माटुंगा, हिंदमातासह वसईमध्ये पाणी साचलं, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा, मुंबईकरांना सतर्कतेचं आवाहन https://goo.gl/mKEXnf
- पालघर, विरारला एनडीआरएफची टीम रवाना, नालासोपारा स्टेशन पाण्यात गेल्यानं बोरीवली-विरार मार्ग बंद, अनेक एक्स्प्रेसही रखडल्यानं प्रवाशांचा खोळंबा https://goo.gl/mKEXnf
- पावसाने मुंबईची अवस्था बिकट, मुंबईतील शाळांना सुट्टी द्या, आशिष शेलारांची मागणी, शिक्षणमंत्र्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना https://goo.gl/mKEXnf
- मुंबईचा पालकमंत्री म्हणून आपत्कालीन कक्षाच्या संपर्कात, विरोधकांच्या सल्ल्याची गरज नाही, गरज पडल्यास अख्खं मंत्रिमंडळ नागपूरहून मुंबईला जाईल, मुसळधार पावसानंतर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/pMKFDu
- वसईत जोरदार पाऊस, जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात 4 फूट पाणी, वर्गात 1 फूट पाणी, गेटवर धबधब्याचं चित्र https://goo.gl/g1Ubdj तर पावसामुळे गरोदर महिला होडीतून रुग्णालयात, अग्निशमन दलाच्या जवानांचं प्रसंगावधान https://goo.gl/2RcZTo
- मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डाची स्थापना करण्याची गरज, भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे रेल्वे बोर्डाला निर्देश, मान्सूनपूर्व तयारीवरुनही रेल्वेला ताशेरे https://goo.gl/djo9rk
- पावसामुळे मुंबई विभागातील 11 वी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल, प्रवेश घेण्यासाठी उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदतवाढ https://goo.gl/mKEXnf
- ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज सासवडला, दर्शनासाठी पंचक्रोशी लोटली, तर तुकाराम महाराजांची पालखी यवतमध्ये, भक्तीसोहळ्यात तरुणाईचाही मोठा सहभाग https://goo.gl/g16wQ1
- पीक विम्यापोटी बीडमधील 773 शेतकऱ्यांना एक रुपया आणि 649 शेतकऱ्यांना दोन रुपये भरपाई, विमा कंपनीकडून थट्टा https://goo.gl/a6snpQ
- ट्रकला चकवा देत ओमनीची एका चाकावर थरारक फिरकी, गुजरातच्या वलसाडमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/EzPyhZ
- अफवा पसरवू नका, व्हॉट्सअपची देशभरातील वृत्तपत्रात जाहिरात https://goo.gl/5VFVoQ
- नेटफ्लिक्सवरील Sacred Games वेब सीरिज वादात, पश्चिम बंगालमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार https://goo.gl/ujaaYV
- मिथुन चक्रवर्तींचा मुलगा महाअक्षय आणि मॉडेल मदालसा शर्मा अखेर विवाहबंधनात, बलात्कार आणि गर्भपाताच्या आरोपानंतर उटीमध्ये छोटेखानी कार्यक्रमात बांधली लगीनगाठ https://goo.gl/eHN68i
- थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या उर्वरित पाच फुटबॉलपटूंना बाहेर काढण्यात यश, रेस्क्यू टीममध्ये फ्लड पंप तज्ज्ञ प्रसाद कुलकर्णींचा समावेश, गुहेतील पाणी उपसण्यासाठी किर्लोस्कर पंप्सची मदत https://abpmajha.abplive.in/
- विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना बेल्जियमशी; पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा हॅझार्डच्या बेल्जियमचा निर्धार https://goo.gl/hny7uc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement