एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09.09.2017
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा व्हॉट्सअॅप बुलेटीनमधून.
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09.09.2017
1. अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, शहीद संतोष महाडिकांची पत्नी देशसेवेसाठी सज्ज, वर्षभराचं ट्रेनिंग पूर्ण करत वीरपत्नी स्वाती लेफ्टनंटपदी रुजू https://goo.gl/7Smfe2
2. संरक्षणमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच निर्मला सीतारमन यांचा मोठा निर्णय, सैन्यात 800 महिलांची भरती करणार https://goo.gl/c5g8o3
3. दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये लैंगिक शोषणानंतर 7 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या, आरोपी बस कंडक्टर अटकेत, रायन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक निलंबित https://goo.gl/fp2b4Q
4. चहूबाजूच्या टीकेनंतर पुण्यातील डॉ. मेधा खोले एक पाऊल मागे, सोवळं मोडल्याची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव http://abpmajha.abplive.in/
5. रांगेत उभं राहून लोकांनी लालबागच्या राजाला फसवलं, दानपेटीत नोटाबंदीत रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा https://goo.gl/9LqjLg
6. 55 बालकांच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्र्यांना जाग, एबीपी माझाच्या बातमीनंतर दीपक सावंत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात, मुलांच्या वॉर्डची पाहणी https://goo.gl/qkz2Ld
7. केंद्राकडून हवी ती मदत घ्या, पण सगळं व्यवस्थित ठेवा, नागपुरात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनांना नितीन गडकरींच्या कानपिचक्या https://goo.gl/x3qnPn
8. एकनाथ खडसेंची चौकशी म्हणजे ‘चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला’, झोटिंग समितीवर 45 लाख 42 हजारांचा खर्च, आरटीआयमधून माहिती उघड https://goo.gl/bXjVdJ
9. यूपीएच्या माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर सीबीआयचे छापे, झारखंडमध्ये पर्यावरण विषयक परवानग्या दिल्याप्रकरणी कारवाई http://abpmajha.abplive.in/
10. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या महापालिकेत जनतेतून महापौर निवडीच्या निर्णयाचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादमध्ये माहिती http://abpmajha.abplive.in/
11. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनवरुन 3 वर्षीय मुलाचं अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपीचा शोध सुरु https://goo.gl/qP3gw6
12. वसईत लोकलमधून पडलेली महिला थोडक्यात बचावली, रेल्वे पोलिस उपनिरीक्षकाने वेळीच हात दिल्यानं अनर्थ टळला https://goo.gl/sTv2so
13. औरंगाबादमध्ये घरात घुसून बँक मॅनेजरची गळा चिरुन हत्या, सातारा परिसरातील छत्रपती नगरातील घटना, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/fJFZN3
14. 13 वर्षीय बलात्कार पीडितेकडून बाळाला जन्म, आई आणि बाळ सुखरुप, सुप्रीम कोर्टाने दिलेली गर्भपाताची परवानगी https://goo.gl/Dc9yPX
15. फिटनेस कायम राहिला तर आणखी 10 वर्षे क्रिकेट खेळेन, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विश्वास https://goo.gl/eiMjV2
माझा स्पेशल : सह्याद्रीच्या लेकीची खणखणीत मुलाखत, लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याशी खास बातचित, रात्री 8 वाजता एबीपी माझावर
माझा कट्टा : विज्ञान ते अध्यात्म, शेती ते तंत्रज्ञान... सर्व विषयांवर कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत गप्पा, रात्री 9 वाजता एबीपी माझावर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement