एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/11/2017
- मुंबईतील 26/11 हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानमध्ये अजूनही मोकाट https://goo.gl/3GdBZ2
- शहिदांचं बलिदान कदापि विसरणार नाही, 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची मुंबईतील 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली https://goo.gl/zvcVcw
- माझाच्या दणक्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग, नागपूरमधील गिट्टीखदान पोलिसांच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या चौकशीचे उपायुक्तांचे आदेश https://goo.gl/VVU9tS
- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्येच्या गर्तेत, एकुलता एक मुलगा मौलवी बनण्याच्या तयारीत, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा गौप्यस्फोट https://goo.gl/m7RGdS
- अहमदनगरमधील नितीन आगे हत्याप्रकरणाची पुन्हा चौकशी होणार, तपासात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती https://goo.gl/kv5u1g
- कल्याणमध्ये महिलेची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की, नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोईंग केल्याने वाद, पोलिसात गुन्हा दाखल https://goo.gl/8i9164
- कॅन्सर, हृदयरोग आणि त्वचारोगांवरच्या 51 औषधांच्या किमतींमध्ये तब्बल 53 टक्क्यांपर्यंत कपात, रुग्णांना मोठा दिलासा https://goo.gl/wvGtD9
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा शिवप्रताप दिन, प्रतापगडावर आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन https://goo.gl/aA4UuP
- नवी मुंबईतल्या तळोजातील धान्य गोदामाच्या आगीत सर्व धान्य जळून खाक, तीन तासानंतर आगीवर नियंत्रण https://goo.gl/UJZsWa तर मानखुर्दमधल्या भंगार गोडाऊनलाही भीषण आगीचा तडाखा, तीन लाखांचं नुकसान https://goo.gl/fpcPRF
- ठाण्यातल्या उपवनमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, इमारतीच्या संरक्षक भिंतीवरुन फिरणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/e4dPKz
- विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या श्रीलंकेची चेंडूशी छेडछाड, गोलंदाज दसुन शनाकावर ICC कडून दंडात्मक कारवाई, पुन्हा चूक न होऊ देण्याची समज https://goo.gl/vEPxrm
- कर्णधार विराट कोहलीच्या खणखणीत द्विशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड; भारताला 405 धावांची आघाडी https://goo.gl/wwCS9E
- पद्मावती सिनेमाच्या समर्थनार्थ दिग्दर्शक एकवटले, चित्रकरण सुरु असणाऱ्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन https://goo.gl/nH2yq3
- मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, केवळ तीन दिवसात दहा लाखापेक्षा जास्त व्ह्यूज https://goo.gl/Jnx4nU
- अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉसकडून बिल गेट्स यांचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित, ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर संपत्ती शंभर डॉलर कोटी डॉलर्सच्या घरात https://goo.gl/8JXLdc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement