एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 19/02/2018
- महाराष्ट्रभरात उत्साहात शिवजयंती, किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, तर दिल्लीतही संसद भवन आणि महाराष्ट्र सदनात दिमाखदार सोहळा https://goo.gl/iWaZ1w
- किल्ले शिवनेरीवर सभा न घेता मुख्यमंत्री मुंबईत परतले, शिवप्रेमींचा संताप, विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंना विचारला जाब https://goo.gl/KvAH1s
- पन्हाळा किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन परतताना अपघात, सांगली जिल्ह्यातल्या ५ तरुणांचा मृत्यू, कोल्हापुरातल्या नागावजवळ ट्रक पलटी होऊन दुर्घटना https://goo.gl/bpWyqU
- शिवस्मारक, डॉ. आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन होऊन दोन वर्षे लोटली, अद्याप एकही वीट रचली नाही, पण भाजप मुख्यालयाचं काम दीड वर्षात पूर्ण झालं, संजय निरुपमांची भाजपवर टीका https://goo.gl/oJwnLn
- भाजप सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हे, ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ घडवला, मित्रपक्ष शिवसेना, एकनाथ खडसे, आणि आशिष देशमुखांसारखे भाजप नेतेसुद्धा नैराश्याने ग्रासलेले, राधाकृष्ण विखे-पाटलांचा भाजपवर निशाणा https://goo.gl/2DNJ43
- 800 कोटींहून सुरु झालेला रोटोमॅक कंपनीचा घोटाळा 3 हजार 695 कोटींवर, कंपनीचा मालक विक्रम कोठारीची सीबीआय चौकशी सुरु, 7 बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड नाही https://goo.gl/k8uyMr
- पीएनबी घोटाळ्यात चीफ फायनान्शियल ऑफिसर विपुल अंबानीची सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी, तर माध्यमांना बघून गोकुळनाथ शेट्टीच्या कुटुंबाचं पलायन http://abpmajha.abplive.in/live-tv
- कॅप्टन अमोल यादवांच्या स्वप्नांना गगनभरारी, एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये जागा, 35 हजार कोटींचा करार https://goo.gl/fBNPGp
- मुंबई ते पुणे केवळ 20 मिनिटात, हायपरलूप ट्रेन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार, व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांची ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमातमाहिती https://goo.gl/75jJK2
- अजिंक्यताऱ्याच्या दरीत पडलेल्यांना वाचवायला गेलेले पोलिसही अडकले, दरीत अडकलेल्या व्यक्तीसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात महाबळेश्वरच्या ट्रेकर्सना यश https://goo.gl/XM2Rcm
- औरंगाबाद-बीड मार्गावर बियर वाहून नेणारा ट्रक उलटला, लोकांनी बियर बॉक्स पळवले, ड्रायव्हर-क्लीनरवर रुग्णालयात उपचार सुरु http://abpmajha.abplive.in/live-tv
- पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींच्या नावे 2.86 लाखांचं बिल, मोदींच्या विविध दौऱ्यातील एअरक्राफ्टसाठी पाककडून नेव्हिगेशन चार्जेस, आरटीआयमधून माहिती समोर https://goo.gl/noGjcm
- भरदिवसा कारची काच फोडून चोरट्यांचा तब्बल 28 तोळ्यांच्या दागिन्यावर डल्ला, कल्याणमधील घटना सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/PZyoFi
- बॉयफ्रेण्डसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच तरुणीची आत्महत्या, किरकोळ भांडणातून तरुणीचं टोकाचं पाऊल https://goo.gl/FJLQLW
- पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात, आध्यात्मिक गुरु बुशरा मेनकासोबत लगीनगाठ https://goo.gl/UkN6td
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement