एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरु झालेल्या लॉकडाऊनवर शरद पवारांची नाराजी? लॉकडाऊनपूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
2. तब्बल 22 ठिकाणांच्या लॉकडाऊनवरुन सरकारमध्ये बेबनाव असल्याचा विरोधकांचा आरोप; तीन पक्षाचं सरकार असल्याने खाटांची रोज कुरकूर होतेय, आशिष शेलार यांची ठाकरे-पवार भेटीवर टीका
3. मुंबईपाठोपाठ ठाण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक भागात अर्धा ते एक फूट पाणी साचलं, तर मुंबईत पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा
4.भारत बायोटेक कंपनी विकसित करत असलेल्या कोरोना संसर्गावरील लसीमध्ये महाराष्ट्राचेही मोठं योगदान, नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये होणार मानवी चाचण्या
5. मेडिकलच्या केंद्रीय कोट्यात ओबीसींच्या 11 हजार जागा हिरावल्याचा आरोप, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार, तर हा प्रकार काँग्रेस सत्तेत असल्यापासून सुरु असल्याचा केंद्राचं उत्तर
6. नागपुरात अवैध धंद्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने महिलांनीच पुढाकार घेऊन दारुविक्रेत्याची केली धुलाई, नरखेड तालुक्यातील आग्रा गावातील प्रकार
7. चार्टर्ड अकाऊंटंट म्हणजेच सनदी लेखापालांच्या मे-जुलै महिन्यातील परीक्षा अखेर रद्द, आता नोव्हेंबरमध्येच होणार परीक्षा; ICAI कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
8. अभिनेता अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, हेलिकॉप्टर लँडिग आणि रिसॉर्टवरील मुक्कामाने अडचणी वाढल्या, पालकमंत्री छगन भुजबळांकडून चौकशीचे आदेश
9. गलवान खोऱ्यातील शहीद जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर, अजय देवगण चित्रपट बनवणार, चित्रपटाचं नाव आणि कलाकार अजून निश्चित झाले नसल्याची सिनेमा ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांची ट्वीटरवर माहिती
10. यावर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवावर कोरोनाचं सावट, साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला साध्या पद्धतीने सुरुवात
BLOG | लसीसाठी पळापळ, कशासाठी!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
माझा कट्टा | गुरूपौर्णिमेनिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर, आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement