एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2020 | गुरुवार
1. मान्सून वेळेतच 1 जून रोजी केरळात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, केरळ किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती
2. भूगोलाच्या पेपरचा प्रश्न मिटला, पण दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा
3. घरी जाण्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या मुंबईतील रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक, कोकणात जाणाऱ्यांसाठी सर्वाधिक बनावट पास
4 परप्रांतीय मजुरांकडून रेल्वे आणि बसचा खर्च घेऊ नये, सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश, तर जेवणाचा आणि तिकीटांचाही खर्च करण्याचे निर्देश
5. गेल्या 24 तासात 131 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तर दोघांचा मृत्यू, राज्यातील 2 हजार 95 पोलिस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात
6. नाना पटोलेंकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद तर पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता
7. पुण्यातील फळ-भाजीपाला मार्केट 31 मेपासून सुरु होणार, 30 तारखेच्या मध्यरात्रीपासून शेतमाल येणार
8. परभणीत जुगार खेळणारे बारा प्रतिष्ठित व्यापारी अटकेत; भाजप नगरसेविकेच्या पुत्राचाही समावेश
9. पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश, पुलवामातील अयानगुंज परिसरात स्फोटकांसाठी वापरलेली कार बॉम्ब लावून उद्ध्वस्त
10. औरंगाबादमध्ये पाच हजाराचा चेक आणा आणि पाच लाखांपर्यंतची कार घेऊन जा, लॉकडाऊनमुळं टाटा कंपनीकडून ग्राहकांना छप्परफाड ऑफर
BLOG | डोक्याला 'ताप' ठरणार पावसाळा, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















