Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 जून 2021 | शुक्रवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 जून 2021 | शुक्रवार | ABP Majha
1. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी, पाणी पातळीत वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा
2. 'सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलनं कशाला?' मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांचं संभाजीराजेंना आश्वासन, समन्वयासाठी समिती नेमण्याची सूचना
3. मराठा समाजाचं आंदोलन स्थगित नाही, 21 जूनला समन्वयकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संभाजीराजेंची माहिती
4. EWS किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडा, SEBC आरक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना MPSC कडून दोन पर्याय, निवड करण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत
5. लहान मुलांवर नोव्हावॅक्स लसीची क्लिनिकल चाचणी घेण्याची पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची योजना, जुलै महिन्यात चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता
6. बारावीच्या निकालासाठी CBSE आणि ICSE चा फॉर्म्युला सुप्रीम कोर्टाला मान्य; दहावी, अकरावी आणि बारावीच्या सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरणार
7. शाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल बंधनकारक नाही, जन्माच्या दाखल्यावरही प्रवेश मिळणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8. दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुंबईतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, शिक्षणमंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
9. मनसुख हिरण हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना अटक, 28 जूनपर्यंत कोठडी; हत्या प्रकरणात सबळ पुरावे असल्याचा एनआयएचा दावा
10 जागतिक कसोटी विजेतेपदाची अंतिम फेरी आजपासून, साऊदम्प्टनच्या मैदानात विराटच्या टीम इंडियासमोर विल्यमसनच्या न्यूझीलंडचं आव्हान