स्मार्ट बुलेटिन | 16 जानेवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात होणार
2. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी राज्यातील 285 केंद्रांवर तयारी पूर्ण, प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लस देणार
3. महाराष्ट्रातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, पुढील आदेशापर्यंत मुंबईतील शाळा बंदच
4. धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय, मात्र चौकशीची टांगती तलवार कायम, शारीरिक संबंधांसाठी मुंडेच ब्लॅकमेल करत होते, तक्रारदार महिलेचा दावा
5. 20 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा पारा घसणार, हवामान विभागाचा अंदाज
6. महाविकास आघाडी सरकारची एक वर्षाची कामगिरी 43 टक्के खूप चांगली, तर नरेंद्र मोदींच्या कामावर 48 टक्के जनता खूप समाधानी, एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्व्हे
7. 2012 मधील ऊसदर आंदोलनाप्रकरणी आमदार सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी निर्दोष, आंदोलनाला पृथ्वीराज चव्हाण दोषी होते, खोत यांची टीका
8. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 82.18 टक्के मतदान
9. युझर्सच्या नाराजीनंतर व्हॉट्सअॅपचं एक पाऊल मागे, गोपनीय धोरणाला तूर्तास स्थगिती, धोरण न स्वीकारल्यास व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होणार नाही
10. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला, भारताकडून नटराजन, ठाकूर आणि सुंदरच्या प्रत्येकी तीन विकेट्स