Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 25 ऑक्टोबर 2021 : सोमवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पंच प्रभाकर यांच्या गौप्यस्फोटानंतर कारवाईपासून संरक्षण मिळण्यासाठी वानखेडेंचं पोलीस महासंचालकांना पत्र, तर मविआतील नेत्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी
Sameer Wankhede Letter To Mumbai CP: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे. समीर वानखेडे यांनी हे पत्र अशावेळी लिहिले आहे, जेव्हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावी याच्या अंगरक्षकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2. क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडेला पुन्हा एनसीबीचं समन्स; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश, यापूर्वी दोन वेळा चौकशी
Mumbai Cruise Drug Case : अभिनेत्री अनन्या पांडेला आज पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अनन्या पांडेला (Ananya Pandey) ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते. दरम्यान, एनसीबी (NCB) सध्या मुंबईतीस क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे.
3. क्रूझ ड्रग्स प्रकरणाला नवं वळण, NCB ने पंचाचे आरोप फेटाळले, मात्र चोर स्वतःला कधी चोर म्हणत नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका
4. आजपासून कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस, लवकरात लवकर विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'मिशन युवा आरोग्य अभियान'
5. विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा, दीड वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 25 ऑक्टोबर 2021 : सोमवार : ABP Majha
6. नाशिकचा लाल दिवा उद्या नांदगावला मिळू शकतो, संजय राऊतांचा छगन भुजबळांना इशारा, शिवसेनेच्या पुण्याईमुळेच भुजबळ राजकारणात, राऊतांचा टोला
7. पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर, 'प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत' योजनेचे उद्घाटन करणार
8. बाजारातल्या दरापेक्षा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, डिजिटल सोनं खरेदीसाठी आरबीआयच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीमच्या सातव्या टप्प्याला सुरुवात
9. पाकिस्तानसोबतच्या पराभवानंतर रोहित शर्मासंदर्भातील प्रश्नावर विराटची गुगली, रोहितची केली पाठराखण
10. टी 20 विश्वचषकात सलामीच्या लढतीत पाककडून भारताचा पराभव, बाबर-रिझवानची दमदार सलामी, पाकिस्तानचा दहा गडी राखून विजय