Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 22 फेब्रुवारी 2022 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. पूर्व युक्रेनमधल्या दोन बंडखोर प्रांतांना रशियाकडून स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता, युक्रेनमधील तणाव चिंतेचा विषय पण संयम ठेवणे आवश्यक, भारताची प्रतिक्रिया
Russia Ukraine Tension : अमेरिका आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा परिणाम (Russia Ukraine Crisis) संपूर्ण युरोपमध्ये दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये जेव्हा वॉशिंग्टननं युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्याच्या असामान्य हालचालींचा अहवाल दिला होता, तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली होती.
रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं मत अमेरिकेकडून व्यक्त केलं जात होतं. त्यांचा दावा आहे की, सुमारे 1 लाख रशियन सैन्य गेल्या आठवड्यापासून युक्रेनच्या सीमेजवळ तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया थंड वातावरण पाहता युक्रेनभोवतीचा बर्फ वितळण्याची वाट पाहत आहे.
दरम्यान, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना पूर्व युक्रेनपासून विभक्त झालेल्या डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या दोन शहरांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाला संबोधित करताना युक्रेनला अमेरिकेची वसाहत असल्याचं सांगितलं आणि युक्रेनचा कारभार हा अमेरिकेवर अवलंबून असल्याचं म्हटलं.
2. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर आज महत्त्वाची सुनावणी, उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाकडे संपकऱ्याचं लक्ष
3. कोरोना आटोक्यात येत असल्याची चिन्ह, मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा शंभरीत तर राज्यातील आकडा 1000च्या आत
4. लस न घेतलेल्यांनाही लोकल, मॉलमध्ये प्रवेश देण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना, सिताराम कुंटेंनी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं न्यायालयाचं मत, राज्य सरकार आज भूमिका मांडणार
5. राणेंच्या बंगल्यातील रेफ्यूजी एरियात बांधकाम केल्याचं उघड, सूत्रांची माहिती, राणेंना मुंबई महापालिकेकडून पुन्हा नोटीस मिळण्याची दाट शक्यता
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 22 फेब्रुवारी 2022 : मंगळवार
6. यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयातून घर जाळलं, होरपळल्यामुळं एकाची मृत्यूशी झुंज, तर 3 जण जखमी
7. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दूरावस्था, शेकडो दुर्मिळ पुस्तकांना वाळवी लागल्याचं उघड, युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
8. मुलाच्या मृत्यूनं नैराश्य, पालकांनी राहत्या घरी केली आत्महत्या, तामिळनाडूच्या कोईम्बतूरची घटना
9. वसई-विरार परिसरात तीन दिवसात तब्बल बर्ड फ्लूमुळं 31 हजार कोंबड्या नष्ट, चिकनची मागणी घटल्यानं माशांचे दर 200 रुपये प्रतिकिलाने वाढले
10. चारा घोटाळ्यातील पाचव्या खटल्यात लालूंना पाच वर्षांच्या शिक्षा; तर 60 लाखांचा दंड