Majha Katta : सध्या पवारांच्या कुटुंबात नेमकं चाललंय काय ? रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar Majha Katta : कुटुंब एकत्र असते, त्यावेळी त्याची मोठी ताकद असते पण भाजपनं तेच कुटुंब फोडल्याचे वक्तव्य कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलं.
Rohit Pawar Majha Katta : राजकीय दृष्टीकोणातून दोन्ही पवार 100 टक्के वेगळे आहोत. राजकारणात आम्ही एकत्र नाही. आमच्यात राजकीय संवाद कुठेही राहिलेला नाही असे वक्तव्य कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले. पण जेव्हा घरातील व्यक्तींचा काही कार्यक्रम असतो, त्यावेळी आमच्यातील सगळेजण जातात. कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. कुटुंब एकत्र असते, त्यावेळी त्याची मोठी ताकद असते पण भाजपनं तेच कुटुंब फोडल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार यांच्याशी व्यक्तिगत चर्चा झाली नाही
राजकीय दृष्टीकोणातून आमचं कुटुंब एक राहिलं आहे असं मला वाटत नाही. मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात बैठकीत मी अजित पवार यांच्याशी बोललो आहे. पण त्यांच्या पलिकडे जाऊन मी अद्याप काहीही बोललो नसल्याचे अजित पवार म्हणाले. मी युवकांचे बरोजगारांचे प्रश्न मांडले मात्र, व्यक्तिगत चर्चा झाली नसल्याचे रोहित पवार म्हणाले. अद्याप चर्चा करण्यासाठी कौटुंबीक व्यासपीठ मिळालं नाही. दिवाळी मी तिथे नसणार आहे. मी युवा संघर्ष यात्रेत असेल माझी मुलं माझ्यावर नाराज झाल्याचे रोहित पवार म्हणाले. पण माझ्या मुलांना मी माझी भूमिका पटवून सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले.
त्या दिवशी मला अजित पवार यांचा फोन आला नाही
दोन जुलैलै मला अजित पवार यांचा फोन आला नाही. कारण ते मला चांगले ओळखतात. मी भूमिका बदलणार नाही हे त्यांना माहित असल्यामुळं मला फोन आला नसल्याचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले. शपथविधी सुरु होता तेव्हा मी शरद पवारसाहेबांसोबत होतो. ते एकच म्हणाले की लढावं लागेल. यावेळी शरद पवारांनी मला तीन ऑप्शन दिले होते. एकतर राजकारण सोडून द्यायचे उद्योग व्यवसाय बघायचा. दुसरे निर्णय बदलायचा आणि तीन इथं राहायचं आणि संघर्ष करायचा. घरी जा आई वडिलांशी बोल, मुलांशी बोल मग निर्णय घे असे शरद पवार म्हणाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मी साहेबांसोब राहून लढायचा निर्णय घेतल्याचे रोहित पवार म्हणाले.
आमच्या प्रश्नांना मंत्र्यांकडून उत्तर दिली जात नाहीत
भाजपच्या काळातच महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे रोहित पवार म्हणाले. मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेल्याचे पवार म्हणाले. महाराष्ट्रातील युवकांवर तुम्ही अन्याय केला आहे, त्यामुळं माफी तुम्ही मागावी असे रोहित पवार म्हणाले. अधिवेशनात आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो मात्र, त्याला मंत्र्यांकडून उत्तरे दिली जात नसल्याचे रोहित पवार म्हणाले. दिलेला शब्द जर मंत्री पाळत नसतील तर सामान्य जनतेची स्थिती काय असेल असे रोहित पवार म्हणाले. मी ज्या अपेक्षेने विधानभवनात आलो, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचे रोहित पवार म्हणाले. शिक्षण, आरोग्य यावर नेते काहीच बोलत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. विरोधात असो किंवा सत्तेत असो आपण मुद्देसूद बोललो पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: