एक्स्प्लोर

ABP Majha Exclusive : लशींच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश... 300 रुपये द्या, लस घ्या, रॅकेट उघडकीस

एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यानं लशीचा काळाबाजार करणाऱ्यांना औरंगाबादमध्ये कैद केलं आहे. तुमच्या आमच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारणाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचारीच आघाडीवर आहे.

ABP Majha Exclusive : औरंगाबाद : जवळपास अर्धा महाराष्ट्र कोरोनाच्या लशीपासून वंचित आहे. लाखो जणांची सकाळ लशीच्या रांगेत सुरु होते. तरी देखील त्याला डोस मिळेल याची शाश्वती नसते. काही जणांना परवडत नसतानाही पदरचे पैसे मोडून खाजगी केंद्रावर लस घ्यावी लागतेय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना लशीचा सर्रास  काळाबाजार सुरु आहे. एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यानं लशीचा काळाबाजार (Corona Vaccine Black Marketing Aurangabad) करणाऱ्यांना कैद केलं आहे.

 तुमच्या आमच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारणाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचारीच आघाडीवर आहे. औरंगाबादमध्ये त्याचं एक उदाहरण समोर आलंय. दररोज सरकारी लसीकरण केंद्रावरच्या 30 ते 40 लसी चोरून, त्याची चोरीछुपे विक्री करणारा गणेश दुरोळे एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  चोरलेल्या लशीची विक्री करण्यासाठी गणेश दुरोळे काही कामगारांना एका खोलीत बोलवत असे. आणि 300 रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकाला लस टोचत असे. हे तर फक्त औरंगाबादचं उदाहरण समोर आलं असेल.  असा काळाबाजार, तुमच्या आमच्या, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय. एबीपी माझानं केलेल्या या स्टिंग ऑपरेशनुमळं लशींचा काळाबाजार आता चव्हाट्यावर आला आहे. 

Corona Vaccine Black Marketing Aurangabad : कोरोना लसींचा काळाबाजार,'माझा'चं स्टिंग ऑपरेशन EXCLUSIVE

औरंगाबादच्या वाळूजजवळच्या साजापूरमधला आरोग्य सेवक गणेश दुरोळे लशी चोरुन त्याची विक्री करत होता. दरम्यान एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या गणेश दुरोळेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

स्टिंग ऑपरेशननंतर अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. लस चोरुन त्याची विक्र करणारा आरोग्य सेवक गणेश दुरोळे हा तर छोटा मासा आहे, त्याच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात? लशीच्या काळाबाजारातले मोठे मासे कोण आहेत? हे रॅकेटची पाळमुळं कुठवर पसरली आहेत? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान औरंगाबादमधला प्रकार हे हिमनगाचं टोक असू शकतं... महाराष्ट्रभर लशीचा काळाबाजार सुरु असू शकतो अशी शक्यता पुण्यातले सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget