ABP Majha Diwali Ank 2021 Released : 'माझा दिवाळी अंक' प्रकाशित; ABP Majha ची वाचक-प्रेक्षकांना खास भेट
ABP Majha Diwali Ank 2021 Released : एबीपी माझाच्या पहिल्या-वहिल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आज दिमाखात पार पडला. यासाठी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
ABP Majha Diwali Ank 2021 Released : आजचा दिवस आणि हा कार्यक्रम एबीपी माझासाठी अत्यंत विशेष आणि खास आहे. टेलिव्हिजन आणि डिजीटल विश्वात आजवर आम्ही तुम्हा प्रेक्षकांच्या साथीनं अनेक नवेप्रयोग केलेत. आपल्या आवडी निवडी जपत गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा थोडक्यातआपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवले. आज या प्रवासाचा पुढचा टप्पा आम्ही सुरु करतोय माझाच्या पहिल्या दिवाळीअंकासोबत. 100 वर्षांहून जुन्या दिवाळी अंकाच्या लेखन-वाचन संस्कृतीचे पाईक होत, एबीपी माझाचा हा दिवाळी अंक आम्ही तुम्ही प्रेक्षकांच्या वाचकांच्या हाती ठेवत आहोत. दिवाळी अंकांच्यासमृद्ध परंपरेच्या प्रवाहात ही छोटीशी ओंजळ वाहण्याच्या आमच्या प्रयत्नाचंमहाराष्ट्र नक्की स्वागत करेल याचा आम्हाला विश्वास आहे. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने 'एबीपी माझा'च्या स्टुडिओत माझाच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
एबीपी माझाच्या पहिल्या-वहिल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. एबीपी माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या निर्मिती आणि वितरणाची जबाबदारी ग्रथांलीने घेतली आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एबीपी माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन मोठ्या दिमाखात पार पडलं.
दिवाळी अंकात लेख, मुलाखत, अनुभव, परिसंवाद, कथा, कवितांची जशी चंगळ आहे. तसेच तुम्हा-आम्हाला जरा विचार करायला लावणारे, जगातील बदलांचीमाहिती देणारे लेखही आहेत. नागराज मंजुळेंवर अमिताभचा कसा प्रभाव आहे किंवा जागतिक दर्जावर मराठी सिनेमाला वैभव मिळवून देणाऱ्या चैतन्य ताम्हाणेचा मातीतील गोष्टीसांगण्यावर भर कसा आहे ते सांगणारे त्यांचे अनुभव आहेत. तसेच देशाला चांगल्यारस्त्यांने जोडण्याचे स्वप्नं पाहाणारे नीतिन गडकरी यांची सविस्तर मुलाखत तुम्हाला वाचायला मिळेल तर महाराष्ट्र कसा समृद्धीच्या महामार्गावर आहे त्याची इत्यंभूतमाहिती देणारा एबीपी माझाच्या टीमचा आलेखही आहे. पी. साईनाथ यांचा विषमतेचे जागतिकीकरण हा लेख किंवा सुहास पळशीकरांचाअस्वस्थता हा लेख, चंद्रकांत कुलकर्णींचं आतडं वाड्यात का अडकलंय ते सांगणारा लेख ही या दिवाळीअंकाची वैशिष्ट्यं आहेत. सानिया, प्रवीण बांदेकर, राजीव तांबे यांचे लेखसौमित्र, संदीप खरे, दादू वैद्य, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, संग्राम हजारे अशा नव्या जुन्यांचा समावेश असलेल्या कवींच्या कविता यांनी हा अंक नटला आहे.
एबीपी माझाच्या या दिवाळी अंकाच्या संकल्पना आणि संयोजनासाठी युनिक फिचर्सचे, विशेषतः आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी, गौरी कानेटकर आणि संतोष षेणई यांचे विशेष आभार निर्मिती आणि वितरणासाठी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, धनंजय गांगल, अरुण जोशी, धनश्री धारपआणि टीम ग्रंथालीचे खास आभार.
आपणा सर्वांना एबीपी माझाकडून निरायमय आरोग्याच्या आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा...!