स्मार्ट बुलेटिन | 29 जानेवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. गाझीपूर सीमेवर नाट्यमय घडामोडी, रस्ता मोकळा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारं प्रशासन नरमलं, शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळाकडे
2. काँग्रेस खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाईंविरोधात गुन्हा दाखल, हिंसाचार भडकावल्याचा आरोप, खोटी माहिती परवल्याचाही ठपका
3. 'आता आपली बाजू निवडण्याची वेळ, मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत, त्यांच्या शांततापूर्वक आंदोलनासोबत', काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्वीट
4. शिवसेनेसह 16 विरोधी पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार, कोणतीही चर्चा न करता कृषी कायदे मंजूर केल्याने विरोधक आक्रमक
5. मुंबई लोकलच्या फेऱ्या आजपासून वाढणार, सर्वसामान्यांना मात्र अजूनही लोकल प्रवासाची प्रतीक्षा
6. मुख्यमंत्री ठाकरेंनी निवडणूक शपथपत्रात बेनामी मालमत्तेची माहिती लपवली, भाजप नेते किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगात
7. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आज संप, वेतन आयोग आणि कंत्राटीकरणाविरोधात कामबंदचा इशारा, संपात सहभागी न होण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
8. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आरिफ भुजवालाचं पाकिस्तान कनेक्शन समोर, एनसीबीचा गौप्यस्फोट, दाऊद इब्राहिमशी संपर्क असल्याचा संशय
9. कल्याणच्या पत्रीपुलाच्या नामांतरावरुन शिवसेना-भाजप आमनेसामने, पत्रीपुलाचं आई तिसाई देवी उड्डाणपूल नाव बदलणार नाही, शिवसेनेचा बॅनरद्वारे इशारा
10. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी, आणखी दोन स्टेंट लावल्या, प्रकृती स्थिर