आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीचे इंदापुरात गोल रिंगण पार पडले असते!
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले असते. तर माऊलींच्या पालखीने फलटण वरून बरडच्या दिशेने मार्गक्रमण केले असते.
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण इंदापूर मध्ये पडले असते. तर माऊलींच्या पालखीचे फलटणमधून बरड साठी प्रस्थान ठेवले असते.
प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले असते. ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने फलटण वरून बरडच्या दिशेने मार्गक्रमण केले असते.
आषाढी वारी निघाली असती तर देहू ते पंढरपूर या एकूण पालखी मार्गातील निमे मार्गक्रमण आता पालखी चे पूर्ण झालेले असते. इथून पुढच्या टप्प्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळत वारकरी पंढरपूरकडे कुच करत असतात. इथून पुढे वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये दिवसागणिक वाढत असते. आजचा माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरडमध्ये झाला असता.
काल सकाळीच बेलवाडी मधले गोल रिंगण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगाव केतकीमध्ये मुक्कामाला आला असता. निमगाव केतकीमधून आज सकाळीच पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले असते. पालखी मार्गात येणाऱ्या सोनाली गावांमध्ये पालखीचे जंगी स्वागत झाले असते आणि त्यानंतर हा पालखी सोहळा गोकुळीचा ओढा येथे काही काळ विसावला असता.
मागच्या वर्षी निमगाव केतकीहून पालखी सोहळा निघाल्यानंतर जी पावसाला सुरुवात झाली होती. ते इंदापूर पोहोचेपर्यंत अंगावर पाऊस घेत ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोष करत वारकरी हे रिंगण खेळण्यासाठी इंदापूर मध्ये पोहोचले होते. पालखी सोहळा साडेदहाच्या नंतर इंदापूर शहरामध्ये पोहचला असता मात्र वारकरी सकाळपासूनच इंदापूर नगरीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली असते.
इंदापूर शहरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये दरवर्षी रिंगण सोहळा होत असे. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील एकूण रिंगण सोहळापैकी इंदापुरमधला रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. कारण शाळेच्या ग्राउंडवरती जिथे हे रिंगण होणार आहेत तिथे लाल माती टाकलेले असायचे बाजूला लोकांना बसण्यासाठी कंपाउंड केलेले असायचे.
मागच्या वर्षी इंदापुर मध्ये पावसाची रिप रिप चालू असतानाच वारकरी रिंगण स्थळी पोहोचले खरे मात्र गाऊन वरती झालेल्या चिखलामुळे रिंगण सोहळा पार पडतो का नाही असा प्रश्न सगळ्या समोर उभा ठाकला होता. मात्र पालखी जशी ग्राउंड मध्ये पोहोचत होती तशी पावसाने ही विश्रांती घेतली होती. पालखीचा स्वागत झाल्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. वारकऱ्यांना रिंगणात धावताना पायाला चिखल लागत असे मात्र तरीही वारकरी धावायचा थांबला नाही.
प्रथेप्रमाणे वीणेकरी टाळकरी भगवा पताका कार्यासोबतच डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिलांनी मोठी कसरत करत रिंगण सोहळा पार पडला. सगळ्यात शेवटी मुख्य आकर्षण असलेले मानाचे अश्व ज्यावेळी लाल मातीतून धावत होते त्यावेळी रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहिल्याचे समाधान उपस्थित भाविकांत पाहायला मिळत होते. खरतर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक जण पावसापासून आपला बचाव करण्यासाठी काहीतरी सोबत घेऊन आला होता. कुणाकडे छत्री होती.. कुणाकडे रेनकोट होता.. मात्र एकदा का हा रिंगण सोहळा सुरू झाला त्यावेळी मात्र कुणाला आज पावसाची तमा नव्हती.
कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गतिमान विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषावर धरलेला ठोका आजही मला जशास तसा आठवत होता. त्यामुळे आषाढी वारी केवळ ही वारकऱ्यांची नाही तर याच वारीतून महात्मा संस्कृतीचे दर्शन टप्प्या टप्प्यावर करताना आम्ही पाहत आलो आहोत.
रिंगण सोहळा पार पडला इंदापूर शहराच्या पायथ्याशीच पालखीतळावर आता तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम ठरलेला असायचा. आजच्या दिवशी इंदापूर शहराला यात्रेचे स्वरूप पाहायला मिळायचं. मोठे मोठे आकाश पाळणे खेळण्याची दुकान, रस्त्याच्या दोन्ही कडेला खाण्यासाठी लागलेले दुकाने या मुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आज वेगळा आंनद मिळाला असता.
दरवर्षीप्रमाणे जर यंदाही वारी निघाली असते तर आज माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यामध्ये शेवटचा मुक्काम बरडला ठरला असता. आज सकाळीच फलटणच्या विमानतळावरुन पालखीने प्रस्थान ठेवलं असतं. बरडला पोहचताना वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळाली असती. फलटणमधून बाहेर पडताना आता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळाली असती.
फलटणहून प्रस्थान ठेवल्यानंतर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने विडणी, पिंपरद, वाजेगाव,निंबळक नाका येथे विश्रांती घेत पुढे बरड कडे कुच केली असती. माऊलींचा पालखी सोहळा ज्यावेळी या पालखी मार्गावर पुढे पंढरपूरकडे जात असे त्यावेळी पालखीच्या गावाच्या नाक्यावर.. फाट्यावर पोहचायचे त्यावेळी गावातील आबालवृद्ध रांगा लावून माऊलींच्या पादुका दर्शन घ्यायचे. यावर्षी वारीच निघाली नाही म्हणूनच वारीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच माऊलींच्या पादुकांचे दर्शन झाले नाही ही हूर हूर गावकऱ्यांत पाहायला मिळतेय.
क्रमशः
यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीचे पाहिले गोल रिंगण बेलवाडीमध्ये पार पडले असते!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज माऊलींच्या पालखीचे पाहिले उभे रिंगण पार पडले असते!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...|आज तुकोबांची पालखी बारामतीमध्ये विसावली असती..
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज वाल्मिकी ऋषींच्या वाल्ह्यात घरावर गुढ्या उभा राहिल्या असत्या!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी.. | आज जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष झाला असता!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीने रोटी घाट पार केला असता!