Nandurbar Temple Fire : दोनशे वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराला भीषण आग, दुसरा मजला जळून खाक
शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात दोनशे वर्ष जुन्या सद्गुरु तोताराम महाराज मंदिराला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे.
Nandurbar Old Temple Fire : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात दोनशे वर्ष जुन्या सद्गुरु तोताराम महाराज मंदिराला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आगीत मंदिराचा दुसरा मजला जळून खाक झाला आहे. दरम्यान, आग लागल्याचे समजताच नंदुरबार आणि शाहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दल आणि गावकऱ्यांच्या एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजले नाही.
प्रकाशा येथे सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे सद्गुरु तोताराम महाराज मंदिर आहे. याठिकाणी आज सकाळीच्या सुमारास आग लागली. आगीने क्षणातच रौद्र रुप धारण केले होते. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर शहादा अग्निशामक दल आले व त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीला ग्रामस्थ होते. त्यानंतर नंदुरबार येथील अग्निशामक दलही आले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुमारे एक तासानंतर आग विझवण्यात यश आले. यामुळं मंदिराचा वरचा मजला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तर मंदिराच्या खालील बाजूस आग लागल्याचे दिसून आले. आगीमध्ये किती नुकसान झाले, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप मात्र कळू शकले नाही.
नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यात तापी नदीचा काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थ-क्षेत्र आहे. हे क्षेत्र दक्षिण काशी म्हणून देखील प्रख्यात आहे. जितके महत्व उत्तर कशीला आहे, तितकेच महत्व दक्षिण काशीला देखील आहे. त्यामुळे प्रकाशा गाव तसे महत्वाचे मानले जाते. दक्षीण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा हे ठिकाण आध्यात्मिक दृष्टया फार पवीत्र आणि भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून सर्वदुर परीचीत आहे. तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झाल्यामुळे याचे पावित्र्य आणखीनच वाढले आहे. केदारेश्वर आणि संगमेश्वर अशी शिवाची मंदिर या ठिकाणी असून 12 ही महिने येथे दर्शनाकरता भाविकांची गर्दी असते.पावसाळयात येथील नदया दोन्ही थळी तुडूंब भरून वाहातात तरी देखील महादेवाला आणि मंदिराला आजतागायत कुठलीही हानी पोहोचलेली नाही. महाशिवरात्रीला आणि श्रावणात या ठिकाणी बरीच गर्दी पहायला मिळते. शहादा तळोदा रस्त्यावर हे ठिकाण आहे आणि नंदुरबार जिल्हयातील लोकांचे हे अतिप्रीय ठिकाण आहे.
महत्त्वाच्या बातम्या: