एक्स्प्लोर

मोठी बातमी : मुंबईत देखभाल करणाऱ्या तरुणावरच कुत्र्याचा हल्ला, अडीच तास लचके तोडले, श्वान पथकही थकलं, तरुणाने जीव सोडला!

Vikhroli News : विक्रोळीतील गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने चक्क त्याचा सांभाळ करणाऱ्याचीच निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

Vikhroli News मुंबई : प्रामाणिकपणा हा श्वानांचा महत्वाचा स्वभाव मानला जातो. किंबहुना आपल्या याच गुण कौशल्यामुळे अनेक श्वान हे पोलीस श्वान पथक आणि सुरक्षारक्षकांच्या पथकात बघायला मिळतात. मात्र विक्रोळी शहरातून एक धक्कादायक बातमीने परिसरात एकच खळबळ उडवली आहे. यात विक्रोळीतील (Vikhroli News)गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने चक्क त्याचा सांभाळ करणाऱ्याचीच निर्घृण हत्या (Dog Bite) केल्याची घटना समोर आली आहे. 

अडीच तास लचके तोडले, श्वान पथकही थकलं

हसरत अली बरकत अली शेख (वय 22 वर्ष) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गोदरेज कंपनीमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनी मार्फत ही श्वान सिक्युरिटी देण्यात येते. या कुत्र्यांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचे काम इथे हसरत अली सारखे तरुण करीत असतात. हसरत अली कडे ग्रेट डेन या जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती. मात्र सोमवारी सकाळी या कुत्र्याने हसरतवर अचानक जोरदार हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे सुमारे अडीच तास हा हल्ला सुरु होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, पालिका श्वान पथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. कुत्र्याला हसरत अली पासून लांब करण्याचा अथक प्रयत्नही करू लागले. पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता. अडीच ते तीन तासानंतर या कुत्र्याला हसरत अली पासून दूर करण्यात यश आले. त्यानंतर हसरत अलीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अतिशय गंभीर जखमा असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी  मार्शल डॉग एजन्सी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या पोलीस करीत आहेत.

वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली

एप्रिल 2023 ते जुलै 2024 या कालावधीत एकट्या भिवंडीत तब्बल 14,216 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, ज्यामध्ये लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. दर महिन्याला शेकडो नागरिक या हल्ल्यांमध्ये जखमी होत आहेत. गेल्या वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या चिंताजनकपणे वाढली आहे.

एप्रिल 2023 मध्ये 628 जणांना, मे महिन्यात 662, जुनमध्ये 504, जुलैमध्ये 987, ऑगस्टमध्ये 1400, सप्टेंबरमध्ये 680, ऑक्टोबरमध्ये 764, नोव्हेंबरमध्ये 746, डिसेंबरमध्ये 926, जानेवारी मध्ये 930, फेब्रुवारीत 956, मार्चमध्ये 1102, एप्रिल  मध्ये 1100, मे महिन्यात 1045, जुनमध्ये 886 आणि जुलै  मध्ये 900 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special ReportABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धस प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
Arvind Kejriwal : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
Gunaratna Sadavarte : प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
Embed widget