एक्स्प्लोर
Advertisement
रेवस ते गेट वे ऑफ इंडिया अंतर 8 तासात पोहून पार, उरणच्या चिमुरडीचा भीमपराक्रम
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 23 किमी अंतर 8 तास 10 मिनिटात पोहून गाठत तिने नवा विक्रम स्थापित केला आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यातील उरणमधील रुद्राक्षी टेमकर या नऊ वर्षीय मुलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रुद्राक्षीने रायगडमधील रेवस ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया हे 23 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून पार केलं. रुद्राक्षी चौथीमध्ये शिकत असून, या नऊ वर्षीय चिमुरडीने समुद्राच्या लाटांशी झुंज देत तिने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
रुद्राक्षीने सकाळी 7:50 वाजता अलिबागमधील रेवस जेट्टीवरुन समुद्रात उडी घेतली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 23 किमी अंतर 8 तास 10 मिनिटात पोहून गाठत तिने नवा विक्रम स्थापित केला आहे. यावेळी गेटवे ऑफ इंडिया येथे तिचे शिक्षक, जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर, जेएनपीटी ट्रस्टी रवी पाटील त्याचप्रमाणे तिच्या नातेवाईकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
रुद्राक्षीच्या या धाडसाचे जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे. अलिबाग शहाबाज हे तिचं मूळ गाव आहे. मात्र सध्या ती उरणमध्ये वास्तव्यास आहे. रुद्राक्षीने 23 किमी सागरी अंतर पोहून पार केलं. तिच्या या भीमपराक्रमामुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
"माझं अपूर्ण स्वप्न रुद्राक्षीने पूर्ण केल्याने मला खूप आनंद झाला आहे," अशा शब्दात तिच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर रुद्राक्षीने आपल्या यशाचं श्रेय प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement