एक्स्प्लोर
एका हत्तीणीची 85 वर्षे...
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्रप्रकल्प एकेकाळी वाघांसाठी प्रसिद्ध होता. 9 डिसेंबर 2013 ला नवेगावबांध-नागझिरा अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाची मान्यता मिळाली. मात्र, सद्यस्थितीत व्याघ्रप्रकल्पातील वाघाची संख्या कमी झाल्याने, पर्यटक एका हत्तीला पाहण्याकरीत मोठी गर्दी करत आहेत.
या हत्तीणीचे नाव रुपा असून तिने 85 वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. मात्र या वयातही रुपा व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन करते आहे.
1931 च्या जवळपास रुपा नामक हत्तीणीचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचाच्या जंगलात झाला. अवघ्या 7 वर्षांची असताना रुपा हत्तीणीला स्वातंत्र्यपूर्व काळातील नवेगावबांधच्या लाकूड आगारात आणून प्रशिक्षण देण्यात आले. सुरवातीला रुपा वनविभागात यंत्राची उपलब्धता नसल्याने लाकडांच्या वाहतुकीसाठी केला जात असे.
कालांतराने नवेगावबांध नागझिराच्या जंगलात वन्यजीवांना पाहण्याकरीत पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने रुपा कामासोबतच पर्यटकांना वनभ्रमंतीदेखाली करु लागली. रुपाने 60 वर्षाचा टप्पा गाठल्यानंतर तिला 1995 मध्ये वन सेवेतून निवृत्त करण्यात आले. रुपाच्या निवृत्तीला 21 वर्षे पूर्ण झाली, तरी आजही ती स्वस्थ आहे. तिला पाहण्यासाठी नवेगावबांध -नागझिरा व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची मोठी गर्दी होते.
पाहा व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement