6th August Headline : अमित शाह आज पिंपरी चिंचवडमध्ये, ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा; आज दिवसभरात
6th August Headline : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेले पोर्टल लाँच करण्यासाठी शाह येणार आहेत.

6th August Headline : आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेले पोर्टल लाँच करण्यासाठी शाह येणार आहेत. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने एकत्र भूमिपूजन पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक आज पार पडणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी अमित शाह पिंपरी चिंचवडमध्ये असतील. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत. शिवाय राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील , छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत संयुक्त बैठक पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची पहिलीच संयुक्त पदाधिकारी बैठक आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सुभास देसाई, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने एकत्र भूमिपूजन
दिल्ली - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने एकत्र भूमिपूजन करण्यात येणार आहे. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थान प्रत्येकी 55, बिहार 49, महाराष्ट्र 44, पश्चिम बंगाल 37, मध्य प्रदेश 34, आसाम 32, ओडिशा 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणा प्रत्येकी 21, झारखंड 20, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील प्रत्येकी 18 , हरियाणातील 15 आणि कर्नाटकातील 13 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी 24,470 कोटी रुपये खर्च येणार असून त्यातून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत वाराणसीच्या दौऱ्यावर
वाराणसी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून दोन दिवसाच्या दौ-यावर वाराणसीत येणार आहेत. यावेळी मोहन भागवत हे श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगतगुरु शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती महाराज यांची भेट घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
