एक्स्प्लोर

अवकाळीच्या मुद्द्यावर अजित पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 50 मिनिटं चर्चा; सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार?

Unseasonal Rain : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ही भेट झाली.

Unseasonal Rain : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) इथे ही भेट झाली. अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ही भेट झाली. साधारण 50 मिनिटं ही बैठक झाली. या बैठकीतील विशेष बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान बैठक संपवून अजित पवार तीनच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार बैठकीनंतर मागच्या गेटने निघाले. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा आहे.

सरकार मदतीच्या विशेष पॅकेजची घोषणा करणार?

दरम्यान अजित पवार यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसंच एका आठवड्यात सर्व पंचनामे केले जातील आणि लवकरच मोबदला दिला जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे एका विशेष मदतीच्या पॅकेजची घोषणा सरकार करणार असल्याचे बैठकीत ठरल्याची माहिती मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं आडवी झाली आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दुपारी दोन वाजता ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजतं.

नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50 हजार ते एक लाखाची मदत द्या : अजित पवार

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, आंबा संत्रा या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजपाला पिकांचेही मोठे नुकसान यामध्ये झाले होते. या नुकसानीमुळं बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर करावी, अशी अजित पवार यांनी केली आपल्या निवेदनात केली आहे.

नारायण राणे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

दरम्यान अजित पवार यांच्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. अवकाळी पावसाने आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची नुकसान भरपाई लवकर मिळावी याबाबत ही बैठक झाली. तसेच येणाऱ्या काळात आंबा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरवला जावा, ज्यामुळे आंबा शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होण्यास मदत होईल, अशी मागणी राणे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget