एक्स्प्लोर

Coronavirus | प्रसुतीनंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेले 10 डॉक्टरांसह 47 जण क्वॉरन्टाईन

पंढरपुरात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरसह 47 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तसंच रुग्णालयही सील करण्यात आलं आहे. या महिलेच्या नवजात बाळाचेही स्वॅब आज घेणार आहेत.

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरांसह 47 जणांना हायरिस्कमुळे क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तसंच रुग्णालयही सील करण्यात आलं आहे. तर गावातील 15 जणांची सोलापुरात तपासणी होणार आहे. दरम्यान महिलेच्या नवजात बाळाचेही स्वॅब आज घेणार असून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास मुलांचं रुग्णालयही सील होण्याची शक्यता आहे.

संबंधित महिलेला प्रसुतीसाठी पंढरपुरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या दहा डॉक्टरसह इतर वैद्यकीय स्टाफमधील 47 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तर तिच्या बाळाला तपासणीसाठी सोलापुरात हलवण्यात आलं आहे.

ही महिला सोलापुरातील एका रुग्णालयातून प्रसुतीसाठी पंढरपूरला दाखल झाली होती. 23 एप्रिलला तिला जुळे झाले, मात्र एका बाळाचे वजन कमी असल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान प्रसुतीनंतर तिला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिला सोलापुरात हलवण्यात आले. तिचे कोरोनाचे अहवाल काल (26 एप्रिल) आले, ज्यात ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

यानंतर प्रशासनाने ती महिला पंढपुरातील हॉस्पिटलमधील ज्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली, अशा 47 जणांना क्वॉरन्टाईन केलं आहे. यामध्ये 10 डॉक्टरांसह 37 इतर वैद्यकीय स्टाफमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांना आता तपासणीसाठी सोलापुरात पाठवले जाणार आहे.

याशिवाय पेनूर गावातील तिच्या गावातील 15 जणांना तपासणीसाठी सोलापुरात दाखल केलं जाणार आहे. तसंच या महिलेच्या नवजात बाळाला रात्री उशिरा सोलापुरात हलवण्यात आलं आहे. सध्या पंढरपुरातील हे नामांकित हॉस्पिटल सील केले असून पेनूर गावही सील करण्यात आलं आहे.

सोलापूरमधील कोरोनाबाधितांची संख्या सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 61 आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 56 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून यातील 54 सोलापूर शहरातील तर दोन जण ग्रामीण म्हणजेच सांगोला आणि मोहोळ तालुक्यातील आहेत.

एकूण कोरोनाबाधित - 61 सोलापूर शहर - 54 सोलापूर ग्रामीण - 2 मृतांची संख्या - 5

Coronavirus Update | सोलापुरात आणखी 11 जणांना कोरोना; एकाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
Embed widget