साथ मरेंगे म्हणत प्रेमीयुगलाने घेतला गळफास; दोर तुटल्याने महिला वाचली, मात्र तरुणाचा मृत्यू
प्रेमीयुगलाने सोबत गळफास घेतला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर दोर तुटल्याने विवाहित महिला वाचली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली
बीड : साथ मरेंगे म्हणत प्रेमीयुगलाने सोबत गळफास घेतला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर दोर तुटल्याने विवाहित महिला वाचली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जयपाल लक्ष्मण वाव्हळ ( वय 27 , रा. भेंड बुद्रुक, ता.गेवराई ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
जयपालची गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवर कल्याण येथील एका तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये फेसबुकवरूनच प्रेम संबंध जुळले. ही महिला दोन दिवसांपूर्वी कल्याणहून भेंड बुद्रुक येथे जयपाल याच्या घरी आली होती. परंतु, संबंधित महिलेच्या पतीने रविवारी तिला फोन केला आणि दोघांवर गुन्हा दाखल करणार असा इशारा दिला. त्यामुळे या दोघांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
संबंधित महिलेच्या पतीने दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा इशार दिल्याने भीतीपोटी साथ मरेंगे या इराद्याने रविवारी पहाटे घरातील आडुला जयपाल आणि त्याच्या प्रेयसीने गळफास घेतला. यावेळी महिलेचा दोर तुटला. त्यामुळे ही महिला वाचली. मात्र जयपाल वाव्हळ याचा यामध्ये मृत्यू झाला. याबाबत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नलघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. कुवारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, जयपाल याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जयपाल याने असे पाऊल उचलायला नको होते अशा भावना त्याचे मित्र व्यक्त करत आहेत.
महत्वाच्य बातम्या
- Sangli Nagar Panchayat Election Result 2022 : कवठे महांकाळमधून रोहित पाटलांची जोरदार एन्ट्री तर कडेगावात विश्वजित कदमांना धक्का
- Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट
- Jalna Nagar Panchayat Election Result 2022 : जालना नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; तर भाजप, शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा