एक्स्प्लोर

2nd february In History : महात्मा गांधी नरेगा कायदा लागू, खुशवंत सिंह यांचा जन्म; आज इतिहासात

Today In History : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे लागू केला जातो आणि हा सरकारच्या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहे.

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी भारतातील प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार खुशवंत सिंह यांचा जन्म झाला होता. तसेच हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

1556: चीनमध्ये भूकंपात 8 लाख लोकांचा मृत्यू (china earthquake)

इतिहासात 2 फेब्रुवारीला अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यातली एक घटना खूपच भयंकर होती. ही घटना चीनच्या Shanxi प्रांतातील विनाशकारी भूकंपाची होती. याभूकंपामुळे चीनमध्ये प्रचंड विध्वंस झाला. सुमारे 8.5 लाख लोक मरण पावले. यावरून या विनाशाचा अंदाज लावता येतो. भारताच्या संदर्भात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 

1915: भारतातील प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार खुशवंत सिंह यांचा जन्म (khushwant singh)

खुशवंत सिंह हे भारतीय लेखक, वकील, कादंबरीकार, पत्रकार आणि राजकारणी होते. आज त्यांची जयंती. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1915 रोजी हदली, पंजाबमध्ये झाला, जो सध्या पाकिस्तानमध्ये झाला. त्यांनी वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि आठ वर्षे लाहोर कोर्टात प्रॅक्टिस केली, पण नंतर काही दिवस प्रॅक्टिस सोडली. 1947 मध्ये त्यांची विदेश सेवेसाठी निवड झाली. त्यांनी टोरंटो आणि कॅनडा येथे स्वतंत्र भारतात सरकारचे माहिती अधिकारी म्हणून काम केले. 1980 ते 1986 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी 'दिल्ली', 'ट्रेन टू पाकिस्तान', 'द कंपनी ऑफ वुमन' अशा अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या. 1974 मध्ये खुशवंत सिंह यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु त्यांनी 1984 मध्ये अमृतसरच्या 'सुवर्ण मंदिरा'मध्ये केंद्र सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ तो परत केला. सन 2000 मध्ये त्यांची 'ऑनेस्ट पर्सन ऑफ द इयर' म्हणून निवड झाली. 2007 मध्ये त्यांना 'पद्मविभूषण'नेही सन्मानित करण्यात आले होते. 20 मार्च 2014 रोजी त्यांचे निधन झाले. 

1979 : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचा जन्मदिन (Shamita Shetty Birthday)

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचा जन्म 2 जानेवारी 1979 रोजी मुंबईत झाला. शमिता ही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आहे. शमिताने फॅशन डिझायनिंगचेही शिक्षण घेतले आहे. शमिता जेव्हा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रासोबत इंटर्नशिप करत होती, तेव्हा मनीषने तिला अभिनयात पदार्पण करण्याचा सल्ला दिला होता. शमिता शेट्टीने यशराज फिल्म्सच्या मोहब्बतें या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच वर्षी तिचं 'शरारा शरारा' हे गाणं आलं. या गाण्याने शमिता रातोरात स्टार झाली. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर, तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर देखील केले, जे खूप लोकप्रिय देखील झाले.

2007: विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता यांचे निधन (vijay arora death anniversary)

प्रसिद्ध अभिनेते विजय अरोरा यांची पुण्यतिथी आहे. विजय अरोरा यांनी 1971 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केली. त्यांचा पहिला चित्रपट 'जरूरत' होता. याशिवाय त्याने झीनत अमानसोबत 'यादों की बारात' या चित्रपटातही काम केले होते. चित्रपटातील रोमँटिक हिट गाणे 'चुरा लिया है तुमने' त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विजय अरोरा यांनी जरूरत, जीवन ज्योती, राखी और हाथकरी, आखिरी चीख, एक मुठ्ठी आसमान, सबसे बड़ा सुख या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 110 चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आणि लोकांची मने जिंकली. रामानंद सागर यांच्या रामायणात विजय अरोरा यांनी मेघनाद ही भूमिका साकारली होती. 

2006 : महात्मा गांधी नरेगा कायदा लागू

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे लागू केला जातो आणि हा सरकारच्या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत सरकारला गरिबांपर्यंत थेट पोहोचता येते आणि विकासासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. या कायद्यांतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात 100 दिवसांची हमी देणारे वेतन/रोजगार दिले जाते. हा कायदा 2 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाला. पहिल्या टप्प्यात 2006-07 मध्ये 27 राज्यांतील 200 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली.  एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या घडामोडी घटना

1953: अखिल भारतीय खादी आणि कुटीर उद्योग मंडळाची स्थापना.
1955: भारत आणि सोव्हिएत युनियनने नवी दिल्ली येथे एक करार केला आणि भारतात 10 लाख टन क्षमतेचा पोलाद प्रकल्प उभारण्याचे मान्य केले.
1990: दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष एफ.डब्ल्यू. डी क्लर्क यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरील 30 वर्षांची बंदी उठवली, नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका आणि वर्णभेदाच्या समाप्तीचा मार्ग मोकळा केला.
1989: अभिनेत्री संदीप धारचा जन्मदिन 
1994: चक्रीवादळ 'जेराल्ड'ने मादागास्करमध्ये कहर केला. लाखो लोक बेघर झाले आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget