एक्स्प्लोर

28 January In History: वेगळ्या देशासाठी 'पाकिस्तान' नावाची सूचना, अमेरिकेचं अंतराळ यान कोसळून सात अंतराळवीरांचा मृत्यू; आज इतिहासात

On This Day In History : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी झाला. काँग्रेसच्या जहालमतवादी गटाचे ते नेते होते. 

28 January In History: प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आणि इतिहास आहे, परंतु 28 जानेवारी हा असा दिवस आहे, जो अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी, 28 जानेवारी 1986 रोजी अमेरिकेचे अंतराळ यान कोसळले आणि त्यामध्ये सात अंतराळवीरांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनाही आजच्याच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली होती. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घडामोडी.

1813- 'प्राईड अँड प्रिज्युडिस या रोमॅंटिक कादंबरीचे प्रकाशन 

ब्रिटनच्या प्रसिद्ध लेखिका जेन ऑस्टेन यांची रोमँटिक कादंबरी 'प्राईड अँड प्रिज्युडिस' हे पुस्तक पहिल्यांदा 28 जानेवारी 1813 रोजी प्रकाशित झाले. इंग्रजी साहित्यातील सर्वात लोकप्रिय कादंबरीमध्ये या कादंबरीची गणना केली जाते.

1835- कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना

कलकत्ता मेडिकल कॉलेज (Medical College Kolkata) म्हणजे सध्याचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कोलकाता या देशातील सर्वात जुन्या मेडिकल कॉलेजची स्थापना ब्रिटिश काळात 28 जानेवारी 1835 रोजी करण्यात आली. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या प्रयत्नाने या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. 

1865- लाला लजपतराय यांचा जन्मदिन 

देशभक्त आणि स्वातंत्रसेनानी लाला  लजपत राय (Lala Lajpat Rai) यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी झाला. लाला लजपत राय हे भारताचे प्रमुख स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना पंजाब केसरी असंही म्हटलं जायचं. त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. ते लाल-बाल-पाल या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी गटातील तीन प्रमुख नेत्यांपैकी एक होते. 1928 मध्ये त्यांनी सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनात भाग घेतला होता. त्या दरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले आणि शेवटी 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. 

1898- भगिनी निवेदिता यांचे भारतात आगमन

स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता (Bhagini Nivedita) यांचे आजच्या दिवशी, म्हणजे 28 जानेवारी 1898 रोजी भारतात आगमन झालं. भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव 'मार्गारेट एलिझाबेथ नोबल' असं होतं. त्या एक अँग्लो-आयरिश समाजसेविका, लेखिका, शिक्षिका आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. भगिनी निवेदिता यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशभक्तांना उघडपणे मदत केली. तसेच स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये सिस्टर निवेदिता यांचे नाव प्राधान्यांनं घेतलं जातं. भगिनी निवेदिता यांची ओळख स्वामी विवेकानंद यांच्या माध्यमातून भारतात झाली. स्वामी विवेकानंदांचे मनमोहक व्यक्तिमत्व, अहंकारहीन स्वभाव आणि भाषणशैली यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. 

1928- अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांचा जन्मदिन

भारतीय अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा (Raja Ramanna) यांचा जन्म आजच्या दिवशी, 28 जानेवारी 1928 रोजी झाला. ते भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे शिल्पकार होते. राजा रामण्णा यांना 1973 मध्ये भारत सरकारने विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 

1933- मुस्लिमांच्या वेगळ्या देशासाठी पाकिस्तान या नावाची सूचना 

स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच धर्माच्या आधारावर वेगळ्या पाकिस्तानची (Pakistan) मागणी केली जात होती. कट्टर धर्मवेडा असलेल्या रहमत अली चौधरी याने 28 जानेवारी 1933 रोजी 'नाऊ ऑर नेव्हर' हा लेख लिहिला आणि त्यामध्ये मुस्लिमांच्या वेगळ्या देशासाठी पाकिस्तान हे नाव सुचवलं. 

1986- अमेरिकेचं अंतराळ यान कोसळलं, सातजणांचा मृत्यू 

इतिहासातील आजचा दिवस अमेरिकन अंतराळाविश्वासाठी अत्यंत धक्का देणारा ठरला. 28 जानेवारी 1986 रोजी अमेरिकेचे स्पेस शटल चॅलेंजर अवकाशात क्रॅश झाले. फ्लोरिडा येथून टेकऑफ केल्यानंतर केवळ 73 सेकंदात त्याचा स्फोट झाला आणि त्यात सर्व सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश होता. या शिक्षकाची अंतराळातील पहिला प्रवासी म्हणून म्हणून निवड झाली होती. 

1998- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा

आजच्याच दिवशी, 28 जानेवारी रोजी देशाची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 तामिळनाडूतील श्रीपेरांबुदूर येथे आत्मघाती स्फोटात हत्या (Rajiv Gandhi Assassination Case) करण्यात आली होती. या हत्येसाठी 1998 मध्ये टाडा कोर्टाने तब्बल 25 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. टाडा कोर्ट, मद्रास उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचल्यावर न्यायमूर्ती केटी थॉमस यांच्या खंडपीठाने 25 पैकी 19 दोषींची सुटका केली होती. मात्र पेरारीवलन, नलिनी श्रीहर, संतान आणि श्रीहरन चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. अन्य तिघांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात आली. 

2007- प्रसिद्ध संगीतकार ओपी नय्यर यांचं निधन 

ओंकार प्रसाद नय्यर म्हणजेच संगीतकार ओ.पी. नय्यर (Omkar Prasad Nayyar) यांचं निधन 28 जानेवारी 2007 रोजी झालं. लाहोरमध्ये जन्मलेले आणि बबल संगीतासाठी ओळखले जाणारे हिंदी चित्रपटांचे ते प्रसिद्ध संगीतकार होते. ओ.पी. नय्यर यांनी 1949 मध्ये कनीज चित्रपटातून पार्श्वसंगीताद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आकाश (1952) साठी संगीत दिले. गुरु दत्त यांचा आरपार (1954) हा त्यांचा पहिला हिट चित्रपट होता. यानंतर गुरू दत्तसोबतच्या त्याच्या जोडीने मिस्टर आणि मिसेस 55 आणि CID सारखे चित्रपट दिले. नय्यर यांनी 'मेरे सनम'मध्ये आपल्या संगीताला एका नव्या उंचीवर नेले. गीता दत्त, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत काम करून त्यांनी यांची कारकीर्द नवीन उंचीवर नेली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai foreigner died: मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai foreigner died: मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Embed widget