एक्स्प्लोर
डिझेल अभावी रत्नागिरीत एसटीच्या 270 फेऱ्या रद्द; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
गेले काही महिने अपुरे डिझेल, पैसे नसल्यामुळे तेल कंपन्यांचे राहिलेले देणे, तसेच कर्मचाऱ्यांची पगारकपात इत्यादी विविध कारणांमुळे रत्नागिरी एसटी आगाराविषयीची मोठी चर्चा सुरु होती.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या एसटी आगारातील 270 फेऱ्या आज डिझेलअभावी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल झाले. गेले काही महिने अपुरे डिझेल, पैसे नसल्यामुळे तेल कंपन्यांचे राहिलेले देणे, तसेच कर्मचाऱ्यांची पगारकपात इत्यादी विविध कारणांमुळे रत्नागिरी एसटी आगाराविषयीची मोठी चर्चा सुरु होती. आज अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्याने या चर्चेत आणखी भर पडली. या गोंधळामुळे प्रवाशांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला.
एसटी आगारात काल (18 डिसेंबर) रात्री डिझेलचा टॅंकर दाखल झाला. मात्र त्यातील डिझेल उतरवून घेण्यात आले नाही. नियमानुसार रात्री टँकरमधून डिझेल उतरवून घेतले जात नाही. त्यामुळे डिझेल उतरवले गेले नाही. आगारात असलेला साठा संपल्यामुळे एसटीच्या अनेक गाड्यांना आज डिझेलचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील 136 आणि शहरी विभागातील 134 अशा 270 फेऱ्या आज रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान आज झाले. प्रवाशांनाही हाल सोसावे लागले.
मागील महिन्यातही म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी एसटी आगारात असाच प्रकार घडला होता. डिझेल पुरवठाच न झाल्याने 439 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर ओढावली होती. आता महिन्याभरातच एसटी डेपोमध्ये डिझेलअभावी फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.
नाशिकमध्येही एसटीचा ढिसाळ कारभार
तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्येही असाच प्रकार घडला होता. डिझेलअभावी एसटी महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एकमधील बससेवा पहाटेपासून ठप्प होती. परिणामी एसटीच्या 100 फेऱ्या रद्द झाल्या होत्या. बसमध्ये भरण्यासाठी डिझेलच नसल्याने कर्मचारी हातावर हात धरुन बसले होते. डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेकांना रजा घ्यावी लागली. अखेर दुपारी साडेचार-पाचच्या सुमारास डिझेल टँकर आल्यानंतर बससेवा पूर्ववत झाली. त्यातही 100 ते 150 लिटर डिझेल टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. एसटी महामंडळ जाणूनबुजून अशी परिस्थिती निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement