एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेला 16, राष्ट्रवादीला 15, काँग्रेसला 12 खाती; ठाकरे-पवार चर्चेत फॉर्म्युला
शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सिल्वर ओकमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये काल (21 नोव्हेंबर) रात्री जवळपास सव्वा तास महत्त्वाच्या विषयावर खलबतं सुरु होती. रात्री 11 वाजता सुरु झालेली चर्चा सव्वाबारा वाजती संपली.
मुंबई : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता महाविकासआघाडीचा नवा फॉर्म्युला समोर येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 11 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहे. शिवसेनेला 27 महामंडळे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 25 महामंडळे मिळणार आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेनेकडे तर शिर्डी संस्थानचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाहणार आहेत.
शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सिल्वर ओकमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये काल (21 नोव्हेंबर) रात्री जवळपास सव्वा तास महत्त्वाच्या विषयावर खलबतं सुरु होती. रात्री 11 वाजता सुरु झालेली चर्चा सव्वाबारा वाजती संपली. राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर होते. मुख्यमंत्रिपद, विधानसभाअध्यक्ष, खातेवाटप, एकसूत्री कार्यक्रम यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर पवार आणि ठाकरेंमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं. बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना संजय राऊतांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याचं कळतं. यानुसार, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळेल, यावर एक नजर टाकूया.
* शिवसेना : नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी खातं
* काँग्रेस : महसूल, ऊर्जा, उच्च तंत्रशिक्षण, ग्रामविकास खातं
* राष्ट्रवादी काँग्रेस : गृह, अर्थ, वैद्यकीय शिक्षण, सहकार खातं
याशिवाय सांस्कृतिक खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतं
बैठकांचा सिलसिला आजही कायम
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आमदारांशी संवाद साधणार आहेत. मातोश्रीवर आज सकाळी 10 वाजता ही बैठक होईल.
- शिवसेनेसोबत संयुक्त बैठक होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मित्रपक्षांसोबत आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल.
- याशिवाय काँग्रेस नेत्यांचीही आज दुपारी एकच्या सुमारास महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेसचा विधीमंडळ नेता आज निवडला जाणार आहे
महाविकासआघाडी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह मित्रपक्षांची महाविकासआघाडी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज (22 नोव्हेंबर) दुपारी संयुक्त बैठक होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील किमान समान कार्यक्रम तयार झाला असून आज तो शिवसेनेसमोर मांडला जाईल. या बैठकीनंतर संध्याकाळी महाविकासआघाडी सरकार बनवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तापेच लवकर सुटेल, अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या
-
- सत्तास्थापनेपूर्वी पवार-ठाकरेंमध्ये खलबतं, रात्री उशिरा एक तास बैठक, बैठकीनंतर संजय राऊतांचे सकारात्मक संकेत
- शिवसेनेच्या युत्यांचा 'सेक्युलर' इतिहास, सत्तेसाठी अनेकदा विरोधकांच्या हात हातात
- सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक
- 2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने संख्याबळाची आकडेवारी दिलीच नव्हती!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement