Nagpur : 'आपली बस'च्या ताफ्यात होणार आणखी 15 ई-बसचा समावेश, मनपाचा टाटा मोटर्ससोबत करार
मनपाने शहर बस सेवेच्या 'आपली बस'च्या ताफ्यात 15 नवीन ई-बसेससाठी टाटा सोबत करार केला आहे. तसेच शहरातील प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलवून दररोज कारवाई करण्यात येत आहे.
![Nagpur : 'आपली बस'च्या ताफ्यात होणार आणखी 15 ई-बसचा समावेश, मनपाचा टाटा मोटर्ससोबत करार 15 more e-buses to be added to 'Aapli Bus' fleet, Corporation's agreement with Tata Motors Nagpur : 'आपली बस'च्या ताफ्यात होणार आणखी 15 ई-बसचा समावेश, मनपाचा टाटा मोटर्ससोबत करार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/803ce7486d9b28119cdb32635b3885e3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यामध्ये आणखी १५ बसेसचा समावेश होण्याला गती मिळाली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या 15 मिडी AC इलेक्ट्रिक बसेस नागरिकांकरिता नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला देण्यात येणार आहेत. यासंदर्भात झालेल्या करारनाम्यावर गुरूवारी स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चिन्मय गोतमारे, मोबिलिटी आणि इन्फ्रा विभागाचे महाव्यस्थापक राजेश दुपारे, परिवहन व्यस्थापक रवींद्र भेलावे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, टाटा मोटर्सचे आदित्य छाजेड उपस्थित होते.
15 इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी स्मार्ट सिटीतर्फे निविदा मागविण्यात आले होते. मेसर्स टाटा मोटर्स यांची निम्नतम निविदा असल्याने बसेसच्या पुरवठ्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्या संदर्भात टाटा मोटर्सचे आदित्य छाजेड यांच्यासोबत करार करण्यात आला.
वाचाः शीना बोरा हत्याकांडाचे परमबीर सिंह कनेक्शन, मित्राच्या जबाबातून माहिती समोर
प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
नागपूरः स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग, सतरंजीपूरा आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत ईतवारी येथील कामधेणु किराणा स्टोअर्स या दुकानाविरूद्ध प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत भंडारा रोड, ईतवारी येथील राजेश इन्टरप्राईजेस या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटका येथील राधे डेरी या दुकानाविरूद्ध प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत रेशिमबाग येथील अमन बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत लोक कल्याण सोसायटी येथील पंकज बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत श्रीकृष्णा नगर येथील महेंद्र बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत पाचपावली येथील शाहू कबाडीवाला यांच्याविरुध्द कबाडीचे पदार्थ परवानगीशिवाय शासकीय जागेत फेल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)