Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांडाचे परमबीर सिंह कनेक्शन, मित्राच्या जबाबातून माहिती समोर
Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्येप्रकरणी (Sheena Bora Murder Case) मोठी माहिती समोर आली आहे. शीना बोरा हत्याकांडाचे परमबीर सिंह कनेक्शन समोर आळे आहे.
Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्येप्रकरणी (Sheena Bora Murder Case) मोठी माहिती समोर आली आहे. शीना बोरा बेपत्ता झाल्याची माहिती 2012 साली सर्वात अगोदर आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांना देण्यात आली होती. शीना बोराचा मित्र राहुल मुखर्जी (Rahul Mukherjee) याने कोर्टात जबाब नोंदवला. या वेळी त्याने ही माहिती कोर्टाला दिली आहे.
राहुल मुखर्जी आपल्या जबाबात म्हणाला, परमबीर सिंह यांनी मला शीना बेपत्ता असल्याची तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलीस स्थानकात गेलो परंतु पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. परमबीर सिंह माझ्या आईचे चांगले मित्र आहेत.
या प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असून शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जीची महत्वाची साक्ष नोंदवली जात आहे. मागील सुनावणीदरम्यान, राहुलला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो अनुपस्थित राहिला होता. त्यानंतर गुरूवारी तो मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर हजर झाला. 17 जूनला होणा-या पुढील सुनावणीतही राहुलची साक्ष सुरू राहील.
दरम्यान राहुलने आपल्या जबाबात पुढे हे देखील स्पष्ट केले की, तक्रार नोंदवण्यास परमबीर सिंह यांनी खास मदत केली नाही. 2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातल्या जंगलात शीना बोराचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी परमबीर सिंह हे कोकण विभागाचे महासंचालक होते. शीना बोराचा मृतदेह हा रायगड जिल्ह्यात सापडला होता.
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीनं वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयनं कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता. इंद्राणी मुखर्जीला साडेसहा वर्षानंतर मे महिन्यात जामीन मंजूर झाला.